“४०० किमीचा प्रवास… २ वर्षांचा असह्य त्रास… आणि कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये मिळाला नवजीवनाचा आधार!”
आटपाडी kd24newz ; सह्याद्री हॉस्पिटल येथे वैद्यकीय क्षेत्रातील एक प्रेरणादायी आणि दिलासा देणारी यशोगाथा समोर आली आहे. तब्बल ४०० किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या एका महिला रुग्णाने दोन वर्षे असह्य वेदनांशी झुंज दिल्यानंतर अखेर येथे उपचार घेत नवजीवन मिळवले.
सदर रुग्णाची यापूर्वी अन्यत्र हिप फ्रॅक्चरची शस्त्रक्रिया झाली होती. मात्र ती शस्त्रक्रिया अपयशी ठरल्याने रुग्णाला चालताना तीव्र वेदना, हालचालींमध्ये अडथळे आणि दैनंदिन जीवनात प्रचंड अडचणी निर्माण झाल्या होत्या. दोन वर्षे हा त्रास सहन करत रुग्ण मानसिक व शारीरिकदृष्ट्या खचली होती.
या गंभीर परिस्थितीत कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी पुढाकार घेत रुग्णावर अत्यंत गुंतागुंतीची रिव्हिजन सर्जरी करत टोटल हिप रिप्लेसमेंट यशस्वीरीत्या पार पाडले. ही शस्त्रक्रिया अत्यंत कौशल्यपूर्ण असून, आधीच्या अपयशी ऑपरेशननंतर ती करणे मोठे आव्हान मानले जाते.
शस्त्रक्रियेनंतर काहीच दिवसांत रुग्णाने लक्षणीय प्रगती दर्शवली. discharge घेताना ती स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने चालताना दिसली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, समाधान आणि नवजीवनाचा उत्साह पाहून उपस्थित सर्वांच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू दाटून आले.
या यशस्वी उपचारामुळे सह्याद्री हॉस्पिटलने पुन्हा एकदा आपल्या दर्जेदार आरोग्यसेवेची आणि तज्ज्ञतेची प्रचिती दिली आहे. “रुग्ण बरा होऊन हसत घरी जातो, हाच आमच्यासाठी खरा सन्मान आहे,” अशी भावना डॉक्टर जयदीप पाटील यांनी व्यक्त केली.
दोन वर्षांचा संघर्ष संपवून नव्या आयुष्याची वाटचाल सुरू करणारी ही घटना केवळ एका रुग्णाची कहाणी नाही, तर आरोग्यसेवेतील समर्पण, कौशल्य आणि मानवतेचा जाज्वल्य विजय आहे.