गोटखिंडीत मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; सरपंच दिपाली पाटील यांच्या हस्ते सत्कार
आटपाडी kd24newz ; गोटखिंडी येथील मातंग समाजाच्या वतीने बारावी परीक्षेत यशस्वी घवघवीत यश संपादन केलेल्या मुला-मुलींचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. गावाच्या पहिल्या लोकनियुक्त महिला सरपंच सौ. दिपाली दिलीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आलेला हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम ठरला आहे.
मान्यवरांच्या हस्ते गौरव....या सोहळ्यात समृद्धी बाजीराव लोंढे, ज्योती सदानंद डबडे, अनुष्का विजय लोंढे, अनुष्का कांबळे, हर्षदा वैभव लोंढे आणि अवधूत सोमनाथ लोंढे या सहा गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर सरपंच सौ. दिपाली पाटील, ग्रामपंचायत सदस्य सौ. अश्विनी दीपक लोंढे, सौ. जयश्री रामचंद्र घारे, स्वीटी पाटील आणि कवयत्री सुरेखा महिपती चिखलकर उपस्थित होत्या.
मनोगतातून मार्गदशन...प्रस्ताविक व स्वागत: माजी सरपंच विजय लोंढे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व सर्व उपस्थितांचे स्वागत केले.
प्रमुख विचार: ग्रामपंचायत सदस्य अश्विनी लोंढे, संभाजी लोंढे, वैभव लोंढे आणि सुरेखा चिखलकर यांनी आपली मनोगते व्यक्त करताना विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषण: सरपंच दिपाली पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "शिक्षणानेच समाजाची प्रगती होते. आजच्या या सत्काराने विद्यार्थ्यांमध्ये नवी उमेद निर्माण होईल."
नियोजन आणि आभार....या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके नियोजन अविनाश सनंदे यांनी केले होते. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. दीपक लोंढे यांनी सर्व उपस्थित मान्यवर, पालक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. या उपक्रमाबद्दल परिसरातून मातंग समाजाचे कौतुक होत आहे.
