Sanvad News फुले एज्युकेशन तर्फे आंबेडकर जयंतीनिमित्त 12 वा. सत्यशोधक पद्धतीने वास्तुशांती समारंभ संपन्न.

फुले एज्युकेशन तर्फे आंबेडकर जयंतीनिमित्त 12 वा. सत्यशोधक पद्धतीने वास्तुशांती समारंभ संपन्न.

Admin

 महापुर्षांचे विचार वारसा आत्मसात करून सत्यशोधक पद्धतीने विधी कार्य करणे आधुनिक काळाची गरज !!! – सत्यशोधक रघुनाथ ढोक

फुले एज्युकेशन तर्फे आंबेडकर जयंतीनिमित्त 12 वा. सत्यशोधक पद्धतीने वास्तुशांती समारंभ संपन्न.

आटपाडी kd24newz :पुणे /ताथवडे :- . फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या वतीने थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या 198 व्या व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त नुकतेच 13 एप्रिल 2025 रोजी दुपारी 1 वाजता सातारा ,वडूज येथील भारतीय स्टेट बँक चे डेप्युटी मॅनेजर सत्यशोधक महेश गोविंद वाघमारे,लातूर यांच्या पुणे - ताथवडे येथील सोनिगरा एस्टीलो मधील B.403 पलॅटची वास्तूशांती व गृहप्रवेश समारंभ सत्यशोधक पद्धतीने संस्थेचे अध्यक्ष व महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासनाचे सदस्य विधीकर्ते सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी नेहमी प्रमाणे महात्मा फुले यांच्या वेशभूषेत मोफत पार पाडला .

यावेळी पलॅटचे दरवाजाला तोरण व भव्य पुष्पहार जेष्ठ समाजसेवक प्रा.विनायक रावसाहेब वाघमारे आणि सौ सविता वाघमारे यांच्या हस्ते बांधण्यात आला तर सत्यशोधक महेश व सत्यशोधिका स्नेहल वाघमारे यांच्या शुभहस्ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास तसेच जेष्ठ समाजसेविका श्रीमती.उषा गोविंद वाघमारे यांचे शुभहस्ते भारताचे संविधान राष्ट्रीय ग्रंथाचे फुले वाहून पूजन करण्यात आले. सत्यशोधक रघुनाथ ढोक आणि प्रा.विनायक व सविता वाघमारे यांचे शुभहस्ते राष्ट्रीय ओबीसी महासंघा तर्फे सन्मानपत्र आणि भारताचे संविधान राष्ट्रीय ग्रंथ व आम्ही पाहिलेले फुले ग्रंथ भेट देण्यात आले.

याप्रंसगी सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की आज विज्ञान युग असताना देखील अजूनही लोक अंधश्रद्धा ,कर्मकांड या मध्ये अडकून पडलेले आहेत . अशा वेळी वाघमारे कुटुंबीय पुढे येऊन महापुर्षांचे विचार वारसा जपण्यासाठी आणि भटजीचे हस्ते होमहवन व कर्मकांड याला तिलांजली देण्यासाठी प्रयत्न करून सत्यशोधक पद्धतीने कार्य कसे उपयुक्त आहे याची प्रचीती आपल्या नातेवाईक व मित्रमंडळीना मिळावी म्हणून हा समारंभ आयोजित केला म्हणून त्यांचे आभार ,अभिनंदन व्यक्त करीत महापुर्षांचे विचार वारसा आत्मसात करून घरातील व इतर विधी कार्य या पुढे सर्वसमाजाने सत्यशोधक पद्धतीने करणे आधुनिक काळाची गरज आहे याविषयी ढोक यांनी मौलिक मार्गदर्शन केले.

यावेळी उदगीर चे प्रा.सुभाष उडबाळे,लातूरचे प्रा.बाबुराव वाघमारे ,नांदेड चे अशोक गंगासागर, वडूज चे नितीनकुमार राऊत ,सत्यनारायण कांबळे, पंढरपूर चे बँक ऑफ महाराष्ट्र चे मॅनेजर मनोज वाघमारे यांनी देखील मानवजातीचे शुभ विचार समोर ठेऊन सर्व बुद्धिवादी लोकांनी यापुढे महात्मा फुले यांच्या सत्यावर आधारित असलेल्या सत्यशोधक पद्धतीने विधी कार्य करावे सोबत सर्व महापुरुषांचे विचाराने सामाजिक कार्य देखील करावे असे म्हणत महेश व स्नेहल चे सर्वांनी अभिनदन करीत हा सोहळा पाहण्याचा योग घडवून आणला त्याबद्ल देखील आभार मानले.

याप्रसंगी सौ.सुगंधा आणि नेमीनाथ जिर्गे यांचे शुभहस्ते सर्वाना रघुनाथ ढोक लिखित सावित्रीबाई फुले ग्रंथ भेट देण्यात आले तर सत्यशोधक महेश वाघमारे यांनी सर्वांचे आभार मानले आणि अक्षय भुडके यांनी मोलाची मदत केली.त्यानंतर सर्वाना पान सुपारी , पेढे वाटून, सुग्रास भोजन दिले .

To Top