Sanvad News फुले एज्युकेशन तर्फे फुले जयंती निमित पुणे येथे सत्यशोधक पद्धतीने ११ वा.गृहप्रवेश सोहळा संपन्न झाला.

फुले एज्युकेशन तर्फे फुले जयंती निमित पुणे येथे सत्यशोधक पद्धतीने ११ वा.गृहप्रवेश सोहळा संपन्न झाला.

Admin

 महात्मा फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकावर आधारित सत्यशोधक विधी कार्याची आजही नितांत गरज !!! – सत्यशोधक ढोक 


फुले एज्युकेशन तर्फे फुले जयंती निमित पुणे येथे सत्यशोधक पद्धतीने ११ वा.गृहप्रवेश सोहळा संपन्न झाला.


आटपाडी kd24newz :पुणे  . फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या वतीने पुणे DSK विश्व जवळील बारामती चे जेष्ठ समाजसेवक रामदास कुदळे यांच्या स्काई स्टार सिटी मध्ये I -२०२ पलॅट चा वास्तू पूजन व गृहप्रवेश सोहळा थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या १९८ व्या जयंतीनिमित्त नुकतेच १३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सत्यशोधक पद्धतीने संस्थेचे अध्यक्ष व महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासनाचे सदश्य विधीकर्ते सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी नेहमी प्रमाणे महात्मा फुले यांच्या वेशभूषेत पार पाडला .

यावेळी पलॅटचे दरवाजाला तोरण व भव्य पुष्पहार जेष्ठ समाजसेवक रामदास कुदळे आणि सौ अलका कुदळे यांच्या हस्ते बांधण्यात आला तर सत्यशोधक अक्षय व वैष्णवी यांच्या शुभहस्ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास व सत्यशोधक गणेश व हर्षदा कुदळे यांचे शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती शाहू महाराज,डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच जेष्ठ समाजसेविका श्रीमती.रुक्मिणी गेनबा कुदळे यांचे शुभहस्ते फुले जयंती दिनी प्रकाशित झालेले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय ग्रंथाचे फुले वाहून पूजन करण्यात आले. सत्यशोधक रघुनाथ ढोक आणि जेष्ठ समाजसेविका रुक्मिणी कुदळे यांचे शुभहस्ते राष्ट्रीय ओबीसी महासंघा तर्फे सन्मानपत्र आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय ग्रंथ भेट देण्यात आले.

याप्रंसगी सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की पेशवे काळानंतर भटजी कडून बहुजन वर्गाची विवाह विधीसारखे अनेक कार्यात मोठी आर्थिक लुबाडणूक व फसवणूक होत होती ,एकदा मित्राचे लग्न वरातीतून महात्मा फुले यांना बाहेर पडावे लागले.मग पुढे जावून महात्मा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना करून २५ डिसेंबर १८७३ रोजी सत्यशोधक विवाह लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी जन्मापासून मृत्यू पर्यंत व इतर कोणत्याही कार्यासाठी भटजी ची मध्यस्थीच नको म्हणून पक्षाघाताचा आजाराला झुंज देत डाव्या हाताने सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ पूर्ण करून समस्थ बहुजन वर्गाला सर्व विधी कार्य करण्यासाठी पर्याय दिला. पुढे ढोक म्हणाले की अंधश्रद्धा ,कर्मकांड याला मूठमाती देण्यासाठी महात्मा फुले यांनी सांगितलेले पद्धतीने आजच्या काळातदेखील सत्यशोधक विधी कार्य प्रत्येक कुटुंबात होणे, आजही नितांत गरज आहे .असे सांगून त्यांनी कुदळे परिवाराचे अभिनंदन केले.

याप्रसंगी सौ.अलका कुदळे यांनी संस्थेच्या वतीने आजचा सत्यशोधक सोहळा ,सर्व विधी आणि माहिती विधीकर्ते ढोक यांनी समजेल आशा भाषेत दिल्याने यापुढे आमच्या घरात फक्त सत्यशोधक पद्धतीने कार्य होतील आणि नातेवाईक परिवारामध्ये सत्यशोधक कार्याचा प्रसार करू असे आश्वासन देत आलेल्या सर्वांचे आभार मानले.त्यानंतर सर्वाना पान सुपारी , पेढे वाटून लेखक ढोक यांचे सावित्रीबाई फुले ग्रंथ भेट देण्यात आले.

To Top