हनुमान जयंती निमित्त विटा बजरंग नगर येथे भव्य दर्शन व दर्शन सोहळा संपन्न
आटपाडी kd24newz :आज दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी, विटा येथील बजरंग नगरमध्ये हनुमान जयंतीनिमित्त भव्य दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. भक्तांनी श्री हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली व सर्वत्र ‘जय श्री राम’ चा जयघोष झाला.
या प्रसंगी अनेक मान्यवरांचे आगमन झाले होते. विशेष उपस्थितीत मा. समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर साहेब, जिल्हा चिटणीस पंकज भैय्या दबडे, प्रदेश उपाध्यक्ष संदीप तात्या ठोँबरे, तसेच सामराय तुंबकी, लक्ष्मण अण्णा देवकर, भीमराव मामा निंबाळकर, गोपाल दादा माने, लक्ष्मण भैया दांडेकर, सागर निंबाळकर, रमेश निंबाळकर, शिदाप्पा गणी, कृष्ण निंबाळकर, पप्पू जाधव, नागेश मोहिते, अनिल पवार, अशोक निंबाळकर, शंकर जेडपे, अनिल देवकर, परसू निंबाळकर, गोविंद मोहिते, विकास भैया देवकर आणि इतर सर्व मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमात सामाजिक एकतेचा संदेश देत उत्सवाचा आनंद मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. बजरंग नगर, विटा (ता. खानापूर, जि. सांगली) येथील स्थानिक समितीने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.