पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन : मा. गोपीचंद पडळकर यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची घेतली भेट
आटपाडी kd24newz :नवी दिल्ली! आमदार मा. गोपीचंद पडळकर यांनी आज नवी दिल्लीत केंद्रिय गृहमंत्री मा. अमित शहा यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील हिमालयासारखी दृढता, राष्ट्रनिष्ठा आणि ध्येयदृढता अनुभवास आली. गृहमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले ऐतिहासिक निर्णय - कलम ३७० हटवले, (CAA), आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) — या गोष्टी देशाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या आहेत. हे निर्णय केवळ धोरणात्मक नसून, हिंदू राष्ट्रनिर्मितीच्या दिशेने टाकलेली निर्णायक पावले आहेत, असे गौरवोद्गार मा. पडळकर यांनी यावेळी काढले.
या भेटीचे औचित्य साधून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजीत विशेष कार्यक्रमासाठी मा. अमित शहा यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आले. राष्ट्रसेवेचा आदर्श ठेवणाऱ्या अहिल्यादेवींच्या जीवनकार्याचे स्मरण करण्यासाठी भाजप आणि संघ परिवाराच्या वतीने देशभरात १२,००० हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. ‘राष्ट्रप्रथम’ हा मंत्र मनाशी बाळगून त्यांनी आपल्या कार्यातून दौलतीपलिकडचं राष्ट्रकार्य साध्य केलं.
या ऐतिहासिक पर्वानिमित्त होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात केंद्रिय गृहमंत्र्यांची उपस्थिती लाभावी, या उद्देशाने दिलेल्या आमंत्रणाला मा.अमित शहा यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस (देवाभाऊ) आणि महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे हेही उपस्थित होते. त्यांनी देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने आपली राष्ट्रनिष्ठा आणि सांस्कृतिक संकल्प व्यक्त केला.
या वर्षीची त्रिशताब्दी जयंती ही अभूतपूर्व आणि ऐतिहासिक स्वरूपाची असेल, यात शंका नाही.