Sanvad News शिस्तभंगाची कारवाई मागे : कुस्तीप्रेमींसाठी दिलासा!

शिस्तभंगाची कारवाई मागे : कुस्तीप्रेमींसाठी दिलासा!

Admin

 शिस्तभंगाची कारवाई मागे : कुस्तीप्रेमींसाठी दिलासा!

राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी पै. महेंद्र गायकवाड यांना सहभागी होण्याची परवानगी

 आटपाडी (kd24newz):पैलवान ग्रुप कुस्तीप्रेमी महाराष्ट्र राज्य संस्थापक व अध्यक्ष पैलवान मारुती (भाऊ) जाधव आणि महाराष्ट्रातील सर्व कुस्तीप्रेमींनी केलेल्या ठाम अव्हानाची दखल घेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने अखेर पायउतार होत उप-महाराष्ट्र केसरी पै. महेंद्र गायकवाड यांच्यावर झालेली शिस्तभंगाची कारवाई मागे घेतली आहे.

दि. १० मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेमार्फत सांगली येथे झालेल्या १७ वर्ष वयोगटाच्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत झालेल्या गैरवर्तनाच्या प्रकरणावरून संबंधित पैलवानास निलंबित करण्यात आले होते. परंतु कुस्ती संघाचे पदाधिकारी व पंचांमध्ये झालेल्या चर्चा आणि प्राप्त झालेल्या निवेदनाच्या आधारे सदर कारवाई मागे घेण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे यासाठी आभार मानले जात असून, तीन वर्ष वयोगटाच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी पै. महेंद्र गायकवाड यांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.

To Top