Sanvad News हजरत माँसाहेब ऊरुसा निमित्त खानापूर येथे नाईट क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन

हजरत माँसाहेब ऊरुसा निमित्त खानापूर येथे नाईट क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन

Admin

 हजरत माँसाहेब ऊरुसा निमित्त खानापूर येथे नाईट क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन

आटपाडी kd24newz: खानापूर येथे हजरत माँसाहेब ऊरुसा निमित्त भव्य हाफपीच खुल्या गट नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन माजी नगराध्यक्ष अली अकबर पिरजादे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या रात्रीच्या क्रिकेट सामन्यांचा उद्घाटन समारंभ सांगली जिल्हा समाज कल्याण सभापती मा. ब्रह्मानंद पडळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाला. उद्घाटनप्रसंगी माजी नगराध्यक्ष अली अकबर पिरजादे, संदीप तात्या ठोंबरे, दाजीभाऊ पवार, उमर पिरजादे, मुन्ना पिरजादे तसेच परिसरातील क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेतील पहिला सामना मासाहेब क्रिकेट क्लब मोही आणि खानापूर फायटर्स यांच्यात रंगला. सामन्याची नाणेफेकही समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आली. तत्पूर्वी पडळकर आणि पिरजादे यांनी मैदानात केलेल्या जोरदार फटकेबाजीला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

दरवर्षी हजरत माँसाहेब ऊरुसाच्या निमित्ताने अशा प्रकारच्या भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचे समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी सांगितले. तसेच माजी नगराध्यक्ष अली अकबर पिरजेदे यांच्या सततच्या सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

To Top