Sanvad News विटा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

विटा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Admin

 विटा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी 

 जयंतीनिमित्त विटा येथे अभिवादन व लाडू-जिलेबी वाटप


आटपाडी kd24newz :विटा (ता. खानापूर) – भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विटा येथे अभिवादन समारंभ व लाडू-जिलेबी वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. महामानव आंबेडकर यांच्या कार्याचा आदरपूर्वक स्मरण करून, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्सवमूर्तीने साजरा करण्यात आला.

     या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मध्ये मा. समाज कल्याण सभापती मा. ब्रह्मानंद पडळकर साहेब, भाजपा जिल्हा सचिव पंकज भैय्या दबडे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे, सरपंच सुशांत शेठ पवार, सरपंच दाजी शेठ पवार, आध्यात्मिक सेल अध्यक्ष संतोष यादव, युवा नेते निलेश पाटील, करण जाधव, विजय जानकर, सुहास कुलकर्णी, सामराय तुंबगी आदी मान्यवर उपस्थित होते.

      कार्यक्रमाची सुरुवातस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आंबेडकर प्रेमी व उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. त्यानंतर सर्व मान्यवरांनी त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत, सामाजिक समतेच्या विचारांना अनुसरण्याचे आवाहन केले. विटा शहरा मध्ये लाडू व जिलेबी वाटप करत उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

      स्थानिक नागरिकांनीही या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेत, 'जय भीम' च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध व प्रेरणादायी पद्धतीने पार पडले.

To Top