खानापूर नगरपंचायतचे नगरसेवक मा. सुहास भैय्या ठोंबरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आटपाडी kd24newz :खानापूर नगरपंचायतचे विद्यमान नगरसेवक, तरुणांचा बुलंद आवाज आणि सामाजिक कार्यात नेहमी आघाडीवर असलेले मा. सुहास भैय्या ठोंबरे यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे खानापूर शहरात विविध विकासकामांना चालना मिळाली असून, युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश आणि फकीरा पॅंथर सेना यांच्यावतीने त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, सुहास भैय्या ठोंबरे हे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश आणि फकीरा पॅंथर सेना अध्यक्ष मा. संदीप तात्या ठोंबरे यांचे पुतणे आहेत. आपल्या कुटुंबातील सामाजिक व राजकीय वारसा पुढे नेत, त्यांनी अल्पावधीतच लोकांच्या मनात विशेष स्थान मिळवले आहे.
त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदैव यश, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
मा. ठोंबरे यांचे सामाजिक भान, तळमळ आणि जनतेशी असलेली नाळ हीच त्यांची खरी ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली खानापूरचा सर्वांगीण विकास निश्चितच घडून येईल, असा विश्वास कार्यकर्ते आणि नागरिक व्यक्त करत आहेत.