श्री.विजयकुमार श्रीरंग यादव ( दलित पॅंथर उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ) आरटीआय महासंघ मुंबई व सामाजिक कार्यकर्ते यांच्या तक्रारीवर सांगली जिल्ह्यात अवैध धंद्यां विरोधात पोलिसांची धडाकेबाज कारवाई : कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त,शेकडो आरोपी अटकेत
सांगली kd24newz: सांगली जिल्ह्यातील विविध भागांमध्ये वाढत्या अवैध मटका, जुगार, दारू, गांजा, एन.डी.पी.एस.आणि इतर बेकायदेशीर धंद्यांवर पोलिसांनी जोरदार कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. *श्री.विजयकुमार श्रीरंग यादव ( दलित पॅंथर उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ) आर.टी.आय महासंघ मुंबई सामाजिक कार्यकर्ते (रा.जायगव्हाण, ता. कवठेमहाकाळ ) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री श्री देवेंद्र फडणीस साहेब पोलीस महासंचालक मुंबई सौ रेशमी शुक्ला मॅडम कोल्हापूर परीक्षण चे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे साहेब नूतन जिल्हाधिकारी श्री अशोक कोकाटे साहेब व श्री संदीप घुगे पोलिस अधीक्षकांकडे दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण LCB या शाखेने कठोर पावले उचलली आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण LCB वरिष्ठ निरीक्षक सतीश शिंदे साहेब व धाडसी अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन पण केले आहे
स्थानिक गुन्हे अन्वेषण LCB पोलिसांनी २०२४ व २०२५ या दोन वर्षांत हजारो आरोपींना अटक करून विविध प्रकारच्या अवैध धंद्यांवर लक्ष केंद्रीत करत कारवाईचा धडाका लावला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण LCB शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली हे सर्व कारवाया यशस्वीरित्या पार पडल्या.
ही कारवाई जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे. अवैध धंद्यांवर पोलिसांची नजर असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींविरोधात अजूनही कठोर पावले उचलली जातील, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सांगली पोलिसांची कारवाई : अवैध धंद्यांवर कठोर कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त...
सांगली – जिल्ह्यातील मटका, जुगार, गांजा, दारू व इतर अवैध धंद्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीने कठोर पावले उचलत गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केली आहे. श्री.विजयकुमार श्रीरंग यादव यांनी दिलेल्या अर्जावरून आणि प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने ही कार्यवाही करण्यात आली आहे.
"मटका व्यवसायावर अद्याप कारवाई का करण्यात आलेली नाही? प्रत्येक तालुक्यात गावोगावी मटक्याचा धंदा जोमात चालू आहे सांगली पोलीस कंट्रोल व तालुका प्रभारी अधिकारी यांना फोन करूनही सांगितले तरी मटक्यावर कारवाई होत नाही सांगली व तालुकास्तरावर पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई का केली नाही? यासंदर्भात श्री विजयकुमार श्रीरंग यादव दलित पॅंथर उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी प्रश्न उपस्थित केला आहे."