Sanvad News घोडेखूर रोडवरील जनावरांच्या व्यवस्थेसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी

घोडेखूर रोडवरील जनावरांच्या व्यवस्थेसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी

Admin

 खरसुंडी येथील घोडेखूर रोडवरील जनावरांच्या व्यवस्थेसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी

आटपाडी (kd24newz): येथील शेतकरी, गायरान धारक व ग्रामस्थांच्या वतीने घोडेखूर रोड महामार्गालगत जनावरांना विश्रांती व चाऱ्याच्या व्यवस्थेसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका उपप्रमुख श्री. शेखर सोमनाथ निंचळ यांनी दिनांक १७ एप्रिल २०२५ रोजी तहसीलदार, आटपाडी यांना लेखी निवेदन दिले आहे.

  घोडेखूर रोडवर दरवर्षी चैत्र शुद्ध पोर्णिमेस पारंपरिक जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर गाई, बैल व अन्य जनावरे विक्रीसाठी आणली जातात. मात्र, त्यांच्यासाठी कोणतीही ठोस व्यवस्था नसल्यामुळे जनावरांना उन्हात उभे रहावे लागते व व्यापाऱ्यांना तसेच ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागते.

  या निवेदनाची प्रत कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी आणि ग्रामपंचायत खरसुंडी यांनाही देण्यात आली आहे. यामुळे प्रशासनाकडून लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन शेतकरी व व्यापाऱ्यांच्या अडचणी दूर होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


या निवेदनात पुढील मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत:

1. जनावरांच्या विश्रांतीसाठी व सावलीसाठी शासकीय जागेचा तातडीने वापर करावा.

2. घोडेखूर रोड महामार्गालगत सुमारे १०००० चौरस फूट जागा कायमस्वरूपी जनावरांच्या व्यवस्थेसाठी राखून ठेवावी.

3. गायरान जमीन किंवा ग्रामपंचायतीच्या मालकीची मोकळी जागा यासाठी वापरात आणावी.

4. जनावरांना पाणी, चारा व औषधोपचाराच्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

5. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने तातडीने ठोस निर्णय घेण्यात यावा.

To Top