आटपाडीचे सुपुत्र पांडुरंग हातेकर – संघर्षातून घडलेला यशस्वी पत्रकार, समाजसेवक आणि चित्रपटसृष्टीतील कलाकार
आटपाडी kd24newz :आटपाडी तालुक्याच्या मातीतून घडलेला आणि विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवणारा चेहरा म्हणजे श्री. पांडुरंग हातेकर. आयुष्यातील संघर्षांना सामोरे जात त्यांनी पत्रकारिता, समाजसेवा, परिवहन सेवा आणि चित्रपटसृष्टी अशा विविध क्षेत्रांत यशस्वी वाटचाल केली आहे.
सध्या ते सीबीएस न्यूज मराठी या प्रसिद्ध वृत्तवाहिनीचे सांगली जिल्हा प्रतिनिधी असून, पोलीस मित्र संघटना – सांगली जिल्हा उपाध्यक्ष या पदावर ते कार्यरत आहेत. पत्रकारितेमधून अनेक ब्रेकींग बातम्यांच्या माध्यमातून त्यांनी समाजातील शोषित, गरजू, कर्जबाजारी आणि वंचित लोकांसाठी न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे. त्यांची बातमीदारी सत्यशोधक आणि निष्पक्षतेची उदाहरणे म्हणून ओळखली जाते.
त्याचबरोबर, राजमुद्रा प्रायव्हेट सर्व्हिसेस लिमिटेड आटपाडी आगार येथे ते बस चालक म्हणून जबाबदारी पार पाडत असून, आपल्या प्रामाणिक आणि शिस्तबद्ध सेवेमुळे लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.
त्यांचे सामाजिक कार्यदेखील तितकेच उल्लेखनीय आहे. त्यांनी पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून पोलीस स्टेशनमध्ये सहकार्य, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग आणि गरजू विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत अशा अनेक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला आहे. विशेषतः कर्जवंचित व गरीब मुलांसाठी केलेले कार्य उल्लेखनीय ठरले आहे.
या सर्वांबरोबरच पांडुरंग हातेकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांनी चार मराठी चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या असून, त्यांचा अभिनयही प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला आहे. त्यांच्या अभिनयातील सहजता, आत्मीयता आणि वास्तववादी शैली यामुळे ते अभिनय क्षेत्रातही लक्षणीय ठरले आहेत.
त्यांनी आपल्या हलाखीच्या परिस्थितीत दोन भावांचे शिक्षण पूर्ण करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत केली. त्यांच्या कुटुंबावरील निष्ठा आणि प्रेम याचे दर्शन त्यांच्या प्रत्येक कृतीतून घडते.
श्री. पांडुरंग हातेकर हे एक सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व असून, पत्रकारिता, समाजसेवा, अभिनय आणि सार्वजनिक जीवनात त्यांनी दिलेल्या योगदानामुळे ते आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.....
आटपाडी.(kd24newz)