Sanvad News एक झंझावात शिक्षक... एक प्रेरणास्थान...

एक झंझावात शिक्षक... एक प्रेरणास्थान...

Admin

 एक झंझावात शिक्षक... एक प्रेरणास्थान....


यु. टी. जाधव सर – शिक्षक जगतातील एक दैदिप्यमान तारा!

आटपाडी kd24newz :आटपाडी तालुक्याच्या मातीतून उगम पावलेला हा हिरा, आज अखंड शिक्षक बांधवांच्या हक्कासाठी झटणारा एक खंबीर योद्धा ठरला आहे.

शिक्षकांच्या व्यथा, अडचणी, प्रश्न – हे सगळं शासनाच्या दरबारात ठामपणे मांडणारा आणि त्यासाठी अहोरात्र मेहनत करणारा एकमेव चेहरा – यु. टी. जाधव सर.

धावपळीच्या कामामध्ये इतका व्यस्त की दोन घास शांत बसून खाण्याचीही उसंत नाही – आणि म्हणूनच गाडीतच वेळ काढत, अन्न घेणारा हा आदर्श शिक्षक. काम, तळमळ, निष्ठा आणि सेवाभाव याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जाधव सर!

तुमच्यासारख्या झंझावात शिक्षकामुळेच शिक्षण क्षेत्राचा आत्मा अजूनही जिवंत आहे.सलाम तुमच्या कार्याला!

 "लेखक:-सुधीर पाटील(kd24newz) संपादक"

To Top