Sanvad News लक्ष्यवेध अकॅडमीचा स्कॉलरशिप निकालात आटपाडी तालुक्यात पुन्हा दबदबा

लक्ष्यवेध अकॅडमीचा स्कॉलरशिप निकालात आटपाडी तालुक्यात पुन्हा दबदबा

Admin

 लक्ष्यवेध अकॅडमीचा स्कॉलरशिप निकालात आटपाडी तालुक्यात पुन्हा दबदबा

आटपाडी kd24newz: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित केलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालात लक्ष्यवेध निवासी अनिवासी अकॅडमीने आटपाडी तालुक्यात आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

       लक्ष्यवेध अकॅडमी नवोदय प्रवेश परीक्षेतील व शिष्यवृत्ती परीक्षेतील उत्तुंग कामगिरीसाठी परिचित आहे. "आम्ही बोलत नाही, आमचा निकाल बोलतो" या ब्रीदवाक्याला साजेसा निकाल यंदाही त्यांनी साध्य केला आहे.

     या वर्षी अकॅडमीच्या पाचव्या बॅचने ऐतिहासिक यश मिळवले असून नवोदयसाठी आजवर २३ विद्यार्थी निवडले गेले आहेत तर शिष्यवृत्ती परीक्षेत आतापर्यंत ५४ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.

    यंदाच्या निकालात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे २०० गुणांच्या वर २३ विद्यार्थ्यांनी, तर १४० ते २०० गुणांदरम्यान २५ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

    या सर्व विद्यार्थ्यांना हजारे सर, माळी सर, बुरजे सर आणि जावीर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. या विद्यार्थ्यांच्या यशाने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्यांच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.

    लक्ष्यवेध अकॅडमीने आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव व दर्जेदार शिक्षण यांची जाणीवपूर्वक रुजवणूक केली आहे. याचा परिणाम म्हणजे निकालांतील सातत्यपूर्ण उत्कृष्टता.

      आगामी शैक्षणिक वर्षासाठी अकॅडमीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक पालक व विद्यार्थ्यांनी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे संचालक मंडळ व मार्गदर्शक शिक्षकांनी केले आहे.

 लक्षवेध अकॅडमीतील गुणवंत विद्यार्थी:

सोहम बनसोडे (२७२ गुण), श्रीजल चव्हाण (२६६ गुण), स्वरा कुंभार (२५६ गुण), श्रीमयी सावंत (२५४ गुण), राजवर्धन करांडे (२५० गुण), प्राची साळुंखे (२४८ गुण), मंथन जाधव (२४६ गुण), आदिती अवचर (२४० गुण), स्वरा मोरे (२३४ गुण), अविष्कार सूर्यवंशी (२३२ गुण), रितिका स्वामी (२३२ गुण), आदित्य गटकुळे (२३० गुण), आरोही क्षिरसागर (२२६ गुण), अनुष्का शेंडगे (२२२ गुण), अनुज जावीर (२२२ गुण), प्रांजल हाके (२२० गुण), मानव मैंदाड (२१२ गुण), साई श्री मोरे (२१० गुण), सार्थक गायकवाड (२१० गुण), प्रणव गायकवाड (२१० गुण), स्वराज चौगुले (२१० गुण) आणि ओम चव्हाण (२०० गुण) यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने संस्थेचे नाव उज्वल केले आहे.

To Top