Sanvad News मारुती शिरतोडे आमदार गोविंदराव कलीकते पुरस्काराने सन्मानित

मारुती शिरतोडे आमदार गोविंदराव कलीकते पुरस्काराने सन्मानित

Admin

 मारुती शिरतोडे आमदार गोविंदराव कलीकते पुरस्काराने सन्मानित

आटपाडी kd24newz :सांगली,शांताई शिक्षण संस्था कोल्हापूर यांचे वतीने प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण कोल्हापूर येथे शाहू स्मारक भवन मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार भाई गोविंदराव कलीकते यांच्या नावाचा पुरस्कार पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीतील आदर्श शिक्षक कार्यकर्ते मारुती शिरतोडे यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार ज्येष्ठ संपादक डॉ वसंत भोसले यांचे हस्ते देण्यात आला. सन्मान चिन्ह, सन्मानपत्र ,पाच हजार रुपयांची ग्रंथसंपदा, शाल आणि बुके असे पुरस्काराचे स्वरूप होते.यावेळी शाहू महाराजांच्या जीवन कार्याचे अभ्यासक डॉ. जे.के पवार , शब्दोत्सव मासिकाचे संपादक हृदयनाथ सावंत ,प्रा. डॉ.दिनकर पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दिनकर पाटील यांनी केले. यावेळी बोलताना संपादक वसंत भोसले म्हणाले की साहित्यिकांनी आपल्या लेखणीचा उपयोग समाज सजग करण्यासाठी करावा. समाज स्थिती निराशाजनक होत असताना साहित्यिक आणि समाजसेवक समाजामध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण करू शकतात. ज्या महापुरुषांच्या नावाने पुरस्कार दिले त्या महापुरुषांच्या वाटेवरून जाण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन आपल्या मनोगतात केले. यावेळी हृदयनाथ सावंत, शाहू अभ्यासक जे.के पवार ,उद्योगपती संग्राम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास राज्याच्या विविध भागातून आलेले प्रमुख कार्यकर्ते ,पलूस केंद्रप्रमुख राम चव्हाण ,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पलूस तालुका अध्यक्ष हिम्मतराव मलमे, शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी बाळासाहेब खेडकर,पलूस गटसाधन केंद्राकडील विषयतज्ञ विनोद आल्हाट,सौ.रंजना शिरतोडे, वैभव शिरतोडे, विशाल शिरतोडे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

To Top