Sanvad News भीमथडी मराठी साहित्य संमेलन १४ व १५ जूनला दौंड येथे होणार

भीमथडी मराठी साहित्य संमेलन १४ व १५ जूनला दौंड येथे होणार

Admin


 भीमथडी मराठी साहित्य संमेलन १४ व १५ जूनला दौंड येथे होणार 

ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव व अध्यक्ष संजय सोनवणे यांची माहिती


आटपाडी kd24newz :दौंड, ता.५ : राज्यस्तरीय चौथे भीमथडी मराठी साहित्य संमेलन शनिवार दि.१४ व रविवार दि.१५ जून २०२५ रोजी केडगाव, चौफुला, ता.दौंड,जि.पुणे येथे होत आहे. या साहित्य संमेलनात उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण सोहळा, ग्रंथदिंडी, परिसंवाद, प्रकट मुलाखत, कथाकथन, नाट्यप्रयोग, सांस्कृतिक, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती संमेलनाचे मुख्य प्रवर्तक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली. 

अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी संमेलनाचे आयोजन करण्यात येते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष बाळासाहेब मुळीक, सचिव दिपक पवार, प्रतिष्ठानचे सदस्य कैलास शेलार, राजाभाऊ जगताप, रामचंद्र नातू, महाराष्ट्र राज्य तमाशा थिएटर मालक संघटनेचे अध्यक्ष डॉ.अशोकराव जाधव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक कांबळे, झोपडपट्टी सुरक्षा दल पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय डाडर, रानकवी जगदीश वनशिव, भाऊसाहेब फडके, नितिन भागवत, आनंदा बारवकर, सुशांत जगताप, अरविंद जगताप आदी उपस्थित होते. 

 दोन दिवस चालणा-या या साहित्य संमेलनात मुक्कामी राहण्याची व जेवणाची सोय करण्यात येणार आहे. साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी कवी, लेखक, कलावंत, साहित्यिक यांनी 9881098481, 8805511060, 9850206977 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन भीमथड़ी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे व सचिव दीपक पवार यांनी केले आहे.

To Top