खड्डेमुक्त रस्त्यासाठी सामाजिक कार्यकर्तीचा पुढाकार: डॉ. मोनिका शिंपी यांच्या प्रयत्नांना यश
आटपाडी kd24newz :दि. १५ मे २०२५ धुळे – नागाव बारी येथील एनएचएआय (भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) च्या सर्व्हिस रोडवर पाण्याच्या टाकीजवळ अनेक दिवसांपासून मोठे खड्डे पडले होते. या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. या समस्येकडे लक्ष वेधत मुक्ता आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मोनिका शिंपी यांनी स्वखर्चाने तात्पुरते मुरुम टाकून रस्ता सुधारला आणि त्यानंतर NHAI अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार करून या रस्त्याच्या काँक्रीटिकरणासाठी पाठपुरावा केला.
त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर संबंधित रस्ता आता संपूर्णपणे काँक्रीटने दुरुस्त करण्यात आला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या कार्यात सहकार्य करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी, कर्मचारी व इतर सर्व सहकाऱ्यांचे संस्थेच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करण्यात आले आहेत
"सामाजिक काम ही केवळ तक्रार करण्यापुरती मर्यादित नसून, त्या मागे सक्रिय पाठपुरावा आणि प्रत्यक्ष कृतीही आवश्यक असते," असे मत डॉ. मोनिका शिंपी यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
दोन्ही व्हिडिओ पहा :