Sanvad News आमदार गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वाला मोठा पाठिंबा;

आमदार गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वाला मोठा पाठिंबा;

Admin

आमदार गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वाला मोठा पाठिंबा

खानापूर-आटपाडी मतदार संघात राजकीय भूकंप; गणेश जाधव, कृष्णात देशमुख, सचिन पाटील यांच्यासह शिवसेना-मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश

आटपाडी,kd24newz दि. १२ जुलै झरे (ता. आटपाडी) येथील गेस्ट हाऊस येथे आज खानापूर-आटपाडी मतदारसंघात एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली. शिवसेना शिंदे गटाचे उपप्रमुख गणेश जाधव, मनसे विटा शहराध्यक्ष कृष्णात हिम्मत देशमुख आणि विसापूर सर्कलचे युवासेना प्रमुख सचिन पाटील यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

     या भव्य प्रवेश सोहळ्याला आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर हे दोघे मान्यवर प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांपासून आटपाडी तालुक्यात आणि खानापूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या विकासकामांना ही ठोस पोचपावती असल्याचे चित्र यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

     या प्रवेशामुळे तालुक्यात भाजपाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घटना अत्यंत निर्णायक ठरू शकते. तालुक्यातील विविध भागातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    भाजपात प्रवेश करताना बोलताना गणेश जाधव यांनी सांगितले, "तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले नेतृत्व म्हणजे गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर. त्यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन आम्ही आज भाजपात प्रवेश केला आहे."

    या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, विरोधी गटांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपात होत असलेली ही सततची दमदार भर ही आगामी निवडणुकांमध्ये पक्षाच्या विजयाचा मजबूत संकेत मानली जात आहे.

To Top