Sanvad News हलाखीची परिस्थिती… तरीही प्रामाणिकतेचा मंत्र सोडला नाही! प्रामाणिक सेवेला सलाम… ‘मनू’ लांडगे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा!

हलाखीची परिस्थिती… तरीही प्रामाणिकतेचा मंत्र सोडला नाही! प्रामाणिक सेवेला सलाम… ‘मनू’ लांडगे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा!

Admin

 हलाखीची परिस्थिती… तरीही प्रामाणिकतेचा मंत्र सोडला नाही! प्रामाणिक सेवेला सलाम… ‘मनू’ लांडगे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा!

हलाखीतून निष्ठेचा झेंडा फडकवणारा मनू उर्फ मन्या लांडगे…! वाढदिवशी शिक्षक समितीचा खंबीर पाठिंबा


आटपाडी kd24newz; गणेश उर्फ मनू (मन्या) वसंत लांडगे… आटपाडीतील 'राज हॉटेल'मध्ये वेटर म्हणून काम करणारे, पण केवळ वेटर नव्हे तर प्रामाणिकतेचे, निष्ठेचे आणि संघर्षाचे एक जिवंत प्रतीक!

    जन्मतारीख 1978 असलेल्या मन्याचा आज वाढदिवस आटपाडी येथे साजरा करण्यात आला.मात्र, हा वाढदिवस केवळ केक कापण्यापुरता मर्यादित नव्हता – तो एका अद्वितीय जीवन संघर्षाचा आणि निष्ठेचा गौरव सोहळा होता. 

     मन्याचं आयुष्य आजही फार हलाखीचं आणि अवघड परिस्थितीतून जात आहे. सहा मुली आणि एक मुलगा, एवढं मोठं कुटुंब सांभाळताना जेव्हा बऱ्याच जणांचा आत्मविश्वास डगमगतो, तेव्हा मनू मात्र अत्यंत शांतपणे, समजूतदारपणे आणि प्रामाणिकपणे आपलं काम करत राहतो.तो गेली बारा वर्षे दत्ता (वस्ताद) देशमुख यांच्याकडे प्रामाणिकपणे काम करत आहे.सर्वात विशेष म्हणजे,त्याच्या अंगावर उचल, तरी त्याला ना पगारवाढीची तक्रार असते, ना कोणती अपेक्षा असते.तो म्हणतो, "जे मिळतं, त्यात मी खूष आहे. दत्ता वस्ताद यांचं हॉटेल कधीच सोडणार नाही!"

    हे वाक्य मन्याच्या मनातील प्रेम, निष्ठा आणि कृतज्ञतेचं दर्शन घडवतं. आजच्या बदलत्या जगात जिथे नोकरी टिकवण्यासाठी मतभेद, तडजोडी आणि नाराजी सामान्य बाबी ठरतात, तिथे मन्याचं हे नातं मालकावर असलेला सच्चा विश्वास आणि समर्पण अधोरेखित करतं आहे.अशा प्रामाणिक आणि समर्पित माणसाच्या पाठीशी आज आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक समिती खंबीरपणे उभी आहे.ज्या ठिकाणी मदतीचं आव्हान असतं, तिथे शिक्षक समिती नेहमी ठामपणे उभी राहते, हे त्यांनी पुन्हा सिद्ध केलं आहे.

या समितीचं कार्य U.T. जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली संपूर्ण तालुक्यात अत्यंत प्रभावीपणे सुरू आहे."मनू लांडगे यांची जिद्द, निष्ठा आणि प्रामाणिक सेवा समाजासाठी एक प्रेरणा आहे," अशा भावना समितीने व्यक्त केल्या.

   या विशेष प्रसंगी संजय कबीर सर, प्रवीण बारसे, दीपक कुंभार सर, दीपक बालटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.सर्वांनी मनूच्या संघर्षमय जीवनप्रवासाला सलाम करत, त्याला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. "तुमचं जीवन संघर्षमय असलं तरी तुमचं निःस्वार्थ समर्पण आणि निष्ठा ही समाजासाठी एक जिवंत प्रेरणा आहे!"

    हा केवळ वाढदिवस नाही,ही आहे एका कष्टकरी माणसाच्या आत्मिक नात्याची आणि शिक्षक समितीसारख्या सामाजिक संस्थेच्या भक्कम पाठबळाची कहाणी जी आजही U. T. जाधव सरांच्या दूरदृष्टीने उभी राहतेय!"

To Top