Sanvad News “आटपाडी नगराध्यक्षपदासाठी बिरा शेठ खांडेकर योग्य पर्याय!; प्रदीप पाटील

“आटपाडी नगराध्यक्षपदासाठी बिरा शेठ खांडेकर योग्य पर्याय!; प्रदीप पाटील

Admin

 “आटपाडी नगराध्यक्षपदासाठी बिरा शेठ खांडेकर योग्य पर्याय!; प्रदीप पाटील 

मा. श्री.बिराशेठ खांडेकर

ओबीसी खुल्या प्रवर्गातून नव्या नेतृत्वाला वाव द्या; आटपाडीत बदलाची हाक


श्री. प्रदीप पाटील

आटपाडी (kd24newz)आटपाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी नुकत्याच झालेल्या आरक्षण सोडतीत ओबीसी खुला प्रवर्ग जाहीर झाला आहे. या घोषणेनंतर शहरातील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून सर्वच गटांत चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर आटपाडीतील युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते बिरा शेठ खांडेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

    आटपाडीचे प्रबुद्ध नागरिक व सामाजिक कार्यकर्ते, डाळिंब व्यापारी श्री.प्रदीप पाटील यांनी सर्वच राजकीय पक्षांना आवाहन करत म्हटले की, “ओबीसी समाजातील पात्र आणि प्रामाणिक तरुणांना आता पुढे आणण्याची वेळ आली आहे. बिरा शेठ खांडेकर यांना संधी दिल्यास आटपाडी नगरपंचायतीला एक कार्यक्षम, प्रामाणिक आणि सामाजिक भान असलेले नेतृत्व लाभेल.”

    नगराध्यक्ष पद ओबीसी खुल्या प्रवर्गातून राखीव झाल्याने आटपाडी शहरातील ओबीसी समाजामध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण पसरले आहे. नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी घटकांनाही संधी मिळाल्यामुळे या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना आणि नव्या विचारांना वाव मिळेल, अशी अपेक्षा जनतेत व्यक्त होत आहे.

   राजकीय जाणकारांच्या मते, जर प्रमुख राजकीय पक्षांनी (भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना इ.) ओबीसी समाजातील नव्या नेतृत्वावर विश्वास दाखवला, तर आटपाडीचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलू शकते.

     बिरा शेठ खांडेकर हे नाव आटपाडीमध्ये गेल्या काही वर्षांत सामाजिक कार्यातून प्रसिद्ध झालं आहे. त्यांच्या कार्याचा ठसा अनेक उपक्रमांमधून दिसतो.

       कोरोना काळात समाजातील सर्व घटकांना मदत करणारे एक आदर्श व्यक्तिमत्व, मुंबईला जाणाऱ्या येणाऱ्या मजुरांना वाहतुकीतून लुटणाऱ्या ट्रॅव्हल्स तिकीट आंदोलन करून तिकीट कमी करून गरजूंना दिलासा देणारा आदर्श उपक्रम!

३,००० महिलांचा भव्य हळदीकुंकू सोहळा आयोजित करून महिलांना सन्मान व प्रेरणा दिली.

 महिलांसाठी मोफत देवदर्शन ट्रिप उपक्रम राबवणे,

शाळांमध्ये वह्या, पुस्तके व पेन वाटप करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण केली.

    ओबीसी व मराठा आरक्षण आंदोलनात गेल्या दहा वर्षांपासून ते सक्रिय असून समाजहितासाठी लढा देत आहेत.

    या उपक्रमांमुळे बिरा शेठ हे केवळ सामाजिक नव्हे, तर लोकाभिमुख नेतृत्वाचे प्रतिक बनले आहेत.

    आटपाडी तालुक्यातील स्थानिक राजकारण काही समाजकेंद्रित बनल्याची टीका मागील काही काळापासून होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रदीप पाटील म्हणाले, “आता नेतृत्वाची मर्यादा तोडण्याची वेळ आली आहे. कोणत्याही समाजाबद्दल मनात भेदभाव न ठेवता, पात्र आणि प्रामाणिक तरुणांना संधी दिली पाहिजे. बिरा शेठ सारखे तरुण या बदलाचे प्रतीक ठरू शकतात.”

     त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “राजकारण हे जनतेच्या विश्वासावर उभं असतं. नगराध्यक्ष पदाच्या निमित्ताने सर्व पक्षांनी या समाजातील कार्यक्षम आणि सामाजिक भान असलेल्या तरुणांना संधी दिली, तर आटपाडी शहराला नव्या युगाची दिशा मिळेल.”

    आगामी निवडणुकीत कोणता पक्ष इतर समाजातील तरुणांना संधी देतो, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. ओबीसी आरक्षणातून पुढे येणारे नेतृत्व हे आगामी राजकीय समीकरण ठरवणारे ठरेल, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

     आटपाडी शहर आज विकासाच्या नव्या टप्प्यावर उभं आहे. त्याला पुढे नेण्यासाठी युवा, ऊर्जावान आणि समाजाभिमुख नेतृत्वाची आवश्यकता आहे. बिरा शेठ खांडेकर यांच्या कार्यातून निर्माण झालेला विश्वास आणि लोकांमधील लोकप्रियता पाहता, ते या पदासाठी योग्य उमेदवार ठरू शकतात, असा सूर आटपाडीभर उमटतो आहे.

     शहरातील सामान्य नागरिकांपासून ते युवकांपर्यंत सर्वत्र एकच चर्चा ऐकू येते, “आता नव्या नेतृत्वाला संधी द्या!”आटपाडीतील तरुणाई, महिला वर्ग, आणि सामाजिक कार्यकर्ते सर्वांनी मिळून बदलाची मागणी सुरू केली आहे. त्यातूनच बिरा शेठ खांडेकर हे नाव जनतेच्या मनात स्थिरावले आहे.

............

आटपाडी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता केवळ उमेदवार नव्हे, तर शहराचे भविष्य निवडले जाणार आहे.

बिरा शेठ खांडेकर यांचं कार्य, त्यांची सामाजिक बांधिलकी आणि लोकांशी असलेला थेट संवाद, हे त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतात. सर्व राजकीय पक्षांनी जर युवा आणि प्रामाणिक नेतृत्वाला संधी दिली, तर आटपाडी नगरपंचायतीच्या इतिहासात एक नवं पान लिहिलं जाईल; प्रदीप पाटील

To Top