प्रभाग ९ मध्ये अनुजाताईंच्या प्रचाराला जनतेचा उसळता प्रतिसाद
‘लोकसेवेची नाळ जोडलेला उमेदवार’अनुजाताईं ; मनीषा तानाजीराव पाटील
आटपाडी;आटपाडी नगरपंचायत प्रभाग क्रमांक ९ मध्ये शिवसेनेच्या उमेदवार अनुजा दत्तात्रय चव्हाण यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेला प्रभागातील नागरिक, महिला, युवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सभेचे नेतृत्व करत मनीषा तानाजीराव पाटील यांनी प्रभावी भाषण करत प्रभागातील विकासकामांचा विश्लेषणात्मक आढावा घेऊन अनुजाताईंना मिळत असलेल्या जनसमर्थनावर भर दिला.
मनीषा तानाजीराव पाटील म्हणाल्या, “अनुजाताई या प्रभाग ९ च्या प्रत्येक घरातील समस्या जाणणाऱ्या, लोकांच्या अडचणींशी जोडलेल्या आणि महिलांच्या आत्मविश्वासासाठी काम करणाऱ्या उमेदवार आहेत. शिवसेनेचा संकल्प विकासाचा आहे, आणि अनुजाताई त्या संकल्पाला प्रामाणिक राहून काम करत आहेत. त्यामुळे प्रभाग ९ मध्ये हवा बदललेली दिसते—आता जनता काम करणाऱ्यांच्या बाजूने उभी आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती, महिला-सक्षमीकरणाचे उपक्रम, विद्यार्थ्यांच्या गरजा—या सर्वांचा विचार करून अनुजाताई सातत्याने काम करत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर अचानक दिसणाऱ्यांना जनता आता ओळखते. खोट्या आश्वासनांना आणि दिखावूपणाला इथल्या नागरिकांनी नेहमीच नकार दिला आहे.”
सभेत उपस्थित महिलांनी अनुजाताईंच्या कार्यशैलीबद्दल कौतुकाची दाद देत त्यांच्या विजयासाठी पूर्ण समर्थन जाहीर केले. तर युवकांनी “प्रभाग ९ मध्ये बदलाची दिशा ठरली—अनुजा ताईंचाच विजय” अशा घोषणा देत वातावरण अधिक तुफानी केले.
मनीषा पाटील यांनी ठामपणे सांगितले की, “प्रभाग ९ मधील जनतेने मनोमन निर्णय घेतलाय—या वेळी मत काम करणाऱ्या उमेदवारालाच! अनुजा दत्तात्रय चव्हाण प्रचंड मताधिक्याने निवडून येतील, हीच जनतेची गर्जना आहे.”
सभेतील प्रचंड गर्दी, उत्साहपूर्ण घोषणा, महिलांचा सहभाग आणि कार्यकर्त्यांची ऊर्जा पाहता प्रभाग क्रमांक ९ मध्ये शिवसेनेची बाजू अधिकच मजबूत झाली आहे.परिसरातील वातावरणातून एकच संदेश समोर येतो की,‘प्रभाग ९ म्हणजे अनुजाताईंनाच विजय!’

