प्रभाग ६ मध्ये ऋषिकेश देशमुख यांना प्रचंड जनसमर्थन; विकासाच्या वचनांवर जनतेचा विश्वास!
“प्रभागातील नागरिकांच्या समस्या हाच माझा पहिला मुद्दा; विजय मिळाल्यास सेवेत कोणतीही कमतरता ठेवणार नाही” ; ऋषिकेश देशमुख
आटपाडी / प्रतिनिधी : आटपाडी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 06 मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार मा. ऋषिकेश बाळासो देशमुख यांच्या समर्थनाची लाट उफाळून आली आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता त्यांच्या विजयाची चिन्हे अधिकाधिक ठळक होताना दिसत आहेत.
प्रभागातील गल्ली ते वस्ती, चौक ते प्रत्येक घरात,जिकडे नजर जाते तिकडे “विकासासाठी ऋषिकेशच हवा!” असा एकमुखी प्रतिसाद उमटत आहे. विशेषत: महिला वर्ग, तरुण, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांचा उमेदवारांना मिळणारा जिव्हाळ्याचा पाठिंबा स्पष्टपणे पुढे येत आहे.
प्रभागाच्या गरजा आणि स्थानिक समस्यांकडे गांभीर्याने पाहत त्या सोडवण्याच्या बांधिलकीचे स्पष्ट संकेत देत ऋषिकेश देशमुख म्हणाले की,
“प्रभागातील समस्या ही माझी पहिली समस्या आहे. प्रत्येक नागरिकासाठी कायम तत्पर आणि अग्रेसर राहून प्रामाणिकपणे काम करण्याची माझी तयारी आहे. मला एक विजयाची संधी दिल्यास तिचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही. प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत विकासाचे लाभ नेण्याची जबाबदारी मी मनापासून स्वीकारतो.”
नगरपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्त्यांची दुरुस्ती, स्ट्रीटलाइट्स, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक सोयीसुविधा, शाळा आणि आरोग्यसेवा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन देशमुख यांनी दिले आहे. तसेच राज्य सरकारच्या विविध योजनांचा फायदा प्रभागातील पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, प्रभागातील वाढते लोकसमर्थन पाहता विरोधकांमध्ये अस्वस्थता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले दिसत आहे. प्रचारादरम्यान उमेदवारांना मिळणारी गर्दी, घोषणांचा उत्साह आणि जनतेतील एकजूट यामुळे विरोधकांच्या छावणीत तणाव वाढल्याचे स्पष्ट दिसते.
प्रभाग 06 मध्ये उमेदवारांबाबत जनतेचा मतप्रवाह एका बाजूला झुकलेला असून, विकासाभिमुख दृष्टीकोन, प्रामाणिक कार्यशैली आणि सर्वसामान्यांशी नाते सांगणारी भाषा या गुणांमुळे ऋषिकेश देशमुख यांचे राजकीय समीकरण अधिक मजबूत झाले आहे.
अंतिम टप्प्यातील प्रचाराच्या वेगाने आणि जनतेच्या प्रतिसादातून स्पष्ट होत आहे की प्रभाग 06 च्या विकासाचा मशाल वाहणारे नेतृत्व म्हणून ऋषिकेश देशमुख यांना प्रचंड जनसमर्थन मिळत आहे, आणि या निवडणुकीत त्यांचा विजय दणदणीत ठरेल अशी लोकभावना प्रकर्षाने जाणवत आहे.
