Sanvad News बाळासाहेब हजारे यांच्या पाठीशी प्रभातील जनता एकदिलान!

बाळासाहेब हजारे यांच्या पाठीशी प्रभातील जनता एकदिलान!

Admin

 बाळासाहेब हजारे यांच्या पाठीशी प्रभातील जनता एकदिलान!


आटपाडी प्रभाग १६ मध्ये प्रचारसभा,बैठकास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद – स्वखर्चाने सोडविले जनतेचे प्रश्‍न!

आटपाडी kd24newz:आटपाडी नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक १६ मध्ये शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब हजारे यांच्या सर्वसमावेशक भूमिकेला आणि युवा उद्योजक राहुल हजारे यांच्या निस्वार्थ सेवाभावाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जनतेचा अपार विश्वास, हजारे कुटुंबाची सेवा परंपरा आणि गेल्या पाच वर्षांत केलेले काम यामुळे या प्रभागात विजयाचा झेंडा शिवसेनेचाच फडकणार असल्याचा ठाम विश्वास ज्येष्ठ नेते तानाजीराव पाटील यांनी व्यक्त केला.

शिवसेनेच्या भव्य प्रचारसमारंभात उमेदवार बाळासाहेब हजारे, युवा नेतृत्व राहुल हजारे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रावसाहेब सागर, सभापती संतोष पुजारी, सोमेश्वर भिंगे, बिरूदेव खांडेकर, मनोहर मरगळे, राहुल घोंगडे यांची उपस्थिती होती. उपस्थितांनी घोषणांच्या गजरात उमेदवारांचे स्वागत केले.

तानाजीराव पाटील म्हणाले की, “जनतेच्या प्रश्नांपासून आम्ही कधीच पळ काढला नाही. काम करायचं हा एकच मंत्र आणि तेच आम्ही सिद्ध केले. सत्ता कुणाचीही असो, काम मात्र शिवसेनेच करत आली आहे.”

भिंगेवाडी छत्रपती शिवरायांना अभिवादन करून पाटील पुढे म्हणाले, नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर विकासाची गती शिवसेनेने दुप्पट केली. स्ट्रीटलाईट, स्पीडब्रेकर, रस्ते, पाणीपुरवठा, गटारी, पथदिवे तसेच अतिरिक्त निधी मिळविण्यात आमचा पुढाकार ठाम राहिला आहे. राज्यात सत्तेत बसलेल्यांनी आटपाडीसाठी शून्य काम केले. उलट शहराचा विकास फक्त शिवसेनेने खांद्यावर घेतला.

त्यांनी पुढे भाष्य करताना सांगितले, “बाळासाहेब हजारे यांचे दातृत्व, सौम्य स्वभाव आणि लोकहिताची धडपड यामुळे या प्रभागातील जनता त्यांना घरबसल्या मत देणार आहे. त्यांचा विजय ठरलेलाच आहे.”

राहुलभैय्या यांच्या संघटनकौशल्याचे कौतुक करत पाटील म्हणाले की ते ‘रिझर्व्ह बँक’ म्हणून परिचित आहेत. मनोहर मरगळे आणि त्यांच्या पत्नी रूपाली मरगळे यांचाही विजय निश्चित असल्याचे त्यांनी नमूद केले.

राहुल हजारे यांनी जनतेचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करत सांगितले, “बाळासाहेब हजारे यांनी नेहमीच लोकांमध्ये मिसळून त्यांचे दुःख जाणून घेतले. विरोधकांची स्थिती जनतेनेच बिकट केली आहे. आम्ही कोणत्याही जाती-धर्मात भेदभाव न करता सेवा केली. प्रभाग १६ आणि १७ हे आमच्या जबाबदारीचे प्रभाग आहेत आणि दोन्ही प्रभागात प्रचंड मताधिक्याने शिवसेना विजयी होईल.”

नगराध्यक्षपदाचे उमेदवार रावसाहेब सागर यांनाही मोठ्या मताधिक्याने विजय मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोफत रुग्णवाहिकेने दिला जीव वाचवणारा दिलासा!

प्रभागातील कोणत्याही वैद्यकीय गरजेसाठी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देत बाळासाहेब हजारे आणि राहुल हजारे यांनी समाजकार्याचा आदर्श निर्माण केला आहे. आरोग्याच्या अडचणीत कोणतेही राजकारण न करता लोकांच्या जीवाला प्राधान्य देत त्यांनी अनेकांना मदत केली. या दातृत्वामुळे प्रभाग १६ मधील नागरिकांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून, “जनता संकटात असताना धावून येणारे हेच आपले खरे नेते,” अशा शब्दांत त्यांचे कौतुक करण्यात आले.

जनतेचा एकच नारा : प्रभाग १६ मध्ये ‘धनुष्यबाण’च विजयी!

यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर विश्वास दर्शवून प्रभाग १६ मध्ये विकासाची गती कायम ठेवण्यासाठी बाळासाहेब हजारे यांनाच विजयी करण्याचे आवाहन केले.

जनतेचा उत्साह, शिवसेनेची कामगिरी आणि उमेदवारांचा सेवाभाव पाहता प्रभाग १६ मध्ये शिवसेनेचा दणदणीत विजय निश्चित झाल्याचे सर्व जण ठामपणे सांगत होते.


To Top