Sanvad News महिला सन्मान व स्वच्छतेचा ठाम अजेंडा — मकर संक्रांतीनिमित्त नगराध्यक्ष यु. टी. जाधव सर यांच्या नेतृत्वाखाली आटपाडीतील सर्व मंदिरांचा ऐतिहासिक कायापालट

महिला सन्मान व स्वच्छतेचा ठाम अजेंडा — मकर संक्रांतीनिमित्त नगराध्यक्ष यु. टी. जाधव सर यांच्या नेतृत्वाखाली आटपाडीतील सर्व मंदिरांचा ऐतिहासिक कायापालट

Admin

 महिला सन्मान व स्वच्छतेचा ठाम अजेंडा — मकर संक्रांतीनिमित्त नगराध्यक्ष यु. टी. जाधव सर यांच्या नेतृत्वाखाली आटपाडीतील सर्व मंदिरांचा ऐतिहासिक कायापालट

आटपाडी (kd24newz): मकर संक्रांतीसारख्या पवित्र व महिलांसाठी विशेष महत्त्व असलेल्या सणाच्या पार्श्वभूमीवर आटपाडी शहरात व्यापक आणि नियोजनबद्ध स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आमदार गोपीचंद पडळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख व माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली, नगराध्यक्ष यु. टी. जाधव सर यांच्या नेतृत्वाखाली आटपाडी शहरातील सर्व मंदिरे स्वच्छ, निर्मळ व सुसज्ज करण्यात आली.


महिलांना मकर संक्रांतीचा सण हळदी-कुंकू, स्नेहमेळावे व धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सुरक्षित, स्वच्छ आणि आनंददायी वातावरणात साजरा करता यावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आटपाडी नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरातील सर्वच मंदिरे पाण्याने स्वच्छ धुऊन घेण्यात आली असून, या कामात नगरपंचायतीचे कर्मचारी व अग्निशामक दलाने सक्रिय सहभाग नोंदविला.

या स्वच्छता मोहिमेस नगरसेवक ऋषिकेश देशमुख, डॉ. जयंत पाटील, महेश देशमुख, अजित जाधव, राधिका दौडे, ललिता जाधव,मनीषा पाटील व मीनाक्षी पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या समन्वयातून मंदिर परिसर, सभामंडप, प्रवेशद्वार तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून सुव्यवस्थित करण्यात आला.

नगराध्यक्ष यु. टी. जाधव सर यांनी महिलांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे, सण-उत्सवांच्या काळात सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता व सुरक्षितता राखणे आणि आटपाडी शहराचा सर्वांगीण कायापालट करणे हा आपला ठाम विकासात्मक अजेंडा असल्याचे स्पष्ट केले. “महिलांचा सन्मान, स्वच्छता आणि सुव्यवस्था हाच खऱ्या अर्थाने लोकाभिमुख विकास आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

या उपक्रमाअंतर्गत आंबाबाई माता मंदिर, सिद्धनाथ मंदिर, जोतीबा मंदिर, सावता माळी मंदिर, ज्योतिर्लिंग मंदिर,दत्त मंदिर,यल्लामादेवी मंदिर, भैरवनाथ मंदिर (सागर मळा 1), संतोषी माता मंदिर, नागदेवी मंदिर विठ्ठल नगर, महालक्ष्मी मंदिर मापटे मळा,यांसह आटपाडी शहरातील सर्वच मंदिरे स्वच्छ करण्यात आली. यामुळे भाविकांमध्ये विशेषतः महिलांमध्ये समाधानाचे व सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मकर संक्रांती हा महिलांचा स्नेह, एकोप्याचा व सामाजिक बांधिलकीचा सण आहे. या सणानिमित्त तिळगुळाप्रमाणे गोड नातेसंबंध जपत सण साजरा व्हावा, यासाठी नगरपंचायत प्रशासनाने आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. स्वच्छ रस्ते, स्वच्छ गटारी आणि सार्वजनिक ठिकाणांची निगा राखण्यावरही विशेष भर देण्यात आला आहे.

या महिला-केंद्रित, लोकहिताच्या व विकासाभिमुख उपक्रमाचे नागरिकांतून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत असून, आटपाडी शहराच्या सकारात्मक परिवर्तनात हा उपक्रम मैलाचा दगड ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे. नगरपंचायतीकडून सर्व महिलांना आवाहन करण्यात येत आहे की, स्वच्छ व सुसज्ज केलेल्या मंदिर परिसरात मकर संक्रांतीचा सण उत्साहात, आनंदात आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करावा.

To Top