Sanvad News माडगुळे पंचायत समिती गणात दादासाहेब मोटे यांचा विजय अटळ

माडगुळे पंचायत समिती गणात दादासाहेब मोटे यांचा विजय अटळ

Admin

 माडगुळे पंचायत समिती गणात दादासाहेब मोटे यांचा विजय अटळ


विकासाची ठोस कामगिरी, स्वच्छ प्रतिमा आणि जनतेशी थेट नाळ : मतदारांचा विश्वास अधिक दृढ

आटपाडी kd24newz : माडगुळे पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार दादासाहेब मोटे यांचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास व्यक्त होत असून, गणातील मतदारांमध्ये त्यांच्या नेतृत्वाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. दादासाहेब मोटे यांचा आजवरचा सामाजिक, शैक्षणिक आणि विकासाभिमुख प्रवास पाहता मतदारांचा त्यांच्यावर असलेला विश्वास अधिक बळकट झाला असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

  दादासाहेब मोटे यांनी सार्वजनिक जीवनात नेहमीच विकासाला प्राधान्य दिले आहे. त्यांच्या कार्यकाळात रस्ते, पाणीपुरवठा, शैक्षणिक सुविधा, सामाजिक सभागृहे यांसारख्या मूलभूत गरजांवर भर देण्यात आला. या विकासकामांचा थेट लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला असून, त्यामुळे त्यांच्या कामाबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

उच्च शिक्षित, अभ्यासू आणि प्रत्येक घटकांशी संवाद साधणारे नेतृत्व म्हणून दादासाहेब मोटे यांची ओळख आहे. युवकांच्या प्रश्नांबाबत त्यांची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिली असून, बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा त्यांचा ठाम निर्धार आहे. तसेच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांना प्रोत्साहन देणे आणि स्वयंरोजगाराला चालना देणे यावरही त्यांचा विशेष भर आहे.

एकंदरच विकासाची भक्कम कामगिरी, स्वच्छ व पारदर्शक प्रतिमा आणि जनतेशी असलेला थेट संपर्क या बळावर माडगुळे पंचायत समिती गणातून दादासाहेब मोटे यांचा विजय अटळ असल्याचे राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे. आगामी निवडणुकीत मतदार मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून देतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

To Top