Sanvad News राष्ट्रीय समाज पक्षाकडून श्री.सत्यवान आप्पासाहेब गलंडे यांची खरसुंडी जि.प.गटातून रिंगणात.

राष्ट्रीय समाज पक्षाकडून श्री.सत्यवान आप्पासाहेब गलंडे यांची खरसुंडी जि.प.गटातून रिंगणात.

Admin

 राष्ट्रीय समाज पक्षाकडून श्री.सत्यवान आप्पासाहेब गलांडे  यांची खरसुंडी जि.प.गटातून रिंगणात.


खरसुंडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी समाज पक्षाचा निर्धार;कपबशीवर विश्वास; विकासासाठी ठोस उमेदवारी

आटपाडी kd24newz : खरसुंडी जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री. सत्यवान आप्पासाहेब गलंडे यांची उमेदवारी जाहीर झाली असून, निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. "सुरुवात नव्या पर्वाची, प्रत्येक क्षण समाजासाठी, प्रत्येक क्षण विकासासाठी..!!" या ब्रीदवाक्यासह उमेदवारांनी प्रचाराची दिशा स्पष्ट केली आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा आणि विकासाचा समतोल साधण्याचा निर्धार श्री. गलंडे यांनी व्यक्त केला आहे. सामान्य माणसाच्या प्रश्नांशी नाते सांगणारे कपबशी (चहा) हे निवडणूक चिन्ह या वेळी चर्चेचा विषय ठरत असून, मतदारांमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

खरसुंडी गटातील विविध गावांमध्ये प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, शेती व युवकांसाठी संधी निर्माण करणे हे प्रमुख मुद्दे प्रचारात मांडले जात आहेत. विकास कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची ग्वाही उमेदवारांकडून देण्यात आली आहे.

स्थानिक पातळीवर पारदर्शक कारभार, लोकसहभागातून निर्णयप्रक्रिया आणि मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणे हा अजेंडा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर खरसुंडी जिल्हा परिषद गटातील लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

दरम्यान, येत्या मतदानात खरसुंडी जिल्हा परिषद गटातील मतदारांनी श्री. सत्यवान आप्पासाहेब गलंडे यांना कपबशी (चहा) या निवडणूक चिन्हासमोरील बटण दाबून विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

To Top