Sanvad News करगणीत शिवसेना–राष्ट्रवादी महायुतीला रामोशी समाजाची ठोस साथ

करगणीत शिवसेना–राष्ट्रवादी महायुतीला रामोशी समाजाची ठोस साथ

Admin

 करगणीत शिवसेना–राष्ट्रवादी महायुतीला रामोशी समाजाची ठोस साथ

मा. विनायकराव मासाळ व मा. दत्तात्रय पाटील यांना जाहीर पाठिंबा; माजी सरपंच मा. विजयसिंह (दादा) सरगर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय

आटपाडी (kd24newz) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करगणी गावात शिवसेना–राष्ट्रवादी महायुतीच्या प्रचाराला मोठे बळ मिळाले आहे. शिवसेना–राष्ट्रवादी युतीचे करगणी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार मा. विनायकराव मासाळ साहेब आणि करगणी पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार मा. दत्तात्रय पाटील यांच्या पाठीमागे भक्कम ताकद उभी करण्याचा ठाम निर्णय करगणी येथील रामोशी समाजातील सर्व तरुण युवक व समाजबांधवांनी घेतला आहे.

करगणी गावचे माजी सरपंच मा. विजयसिंह (दादा) सरगर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमुखाने जाहीर करण्यात आला. यावेळी उपस्थित समाजबांधवांनी सांगितले की, विकासकामांचा अनुभव, लोकांशी थेट संवाद आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी असलेली बांधिलकी पाहता महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या जाहीर पाठिंब्यामुळे करगणी गटातील निवडणूक वातावरण अधिकच तापले असून शिवसेना–राष्ट्रवादी महायुतीची ताकद वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. याप्रसंगी करगणीतील शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महायुतीचे समर्थक तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी एकजुटीने महायुतीच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला.

रामोशी समाजाच्या या ठोस भूमिकेमुळे येत्या निवडणुकीत करगणी गटात महायुतीच्या उमेदवारांना निर्णायक आघाडी मिळेल, असा विश्वास राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

To Top