Sanvad News आटपाडी नगरपंचायतीच्या सत्ताकेंद्राची धुरा नगराध्यक्ष मा.उत्तम जाधव (यु.टी.) सर यांच्या सक्षम हातात

आटपाडी नगरपंचायतीच्या सत्ताकेंद्राची धुरा नगराध्यक्ष मा.उत्तम जाधव (यु.टी.) सर यांच्या सक्षम हातात

Admin

  आटपाडी नगरपंचायतीच्या सत्ताकेंद्राची धुरा नगराध्यक्ष मा. उत्तम जाधव (यु.टी.) सर यांच्या सक्षम हातात

स्थायी समिती सभापतीपदाच्या माध्यमातून नगरपंचायतीवर ठोस नियंत्रण

आटपाडी kd24newz;आटपाडी नगरपंचायत कार्यालयात पिठासन अधिकारी वैभव हजारे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांच्या बिनविरोध निवडी पार पडल्या. या निवडीनंतर नगरपंचायतीच्या स्थायी समिती सभापतीपदी नगराध्यक्ष मा. उत्तम जाधव (यु. टी.) सर यांची निवड करण्यात आली असून, नगरपंचायतीच्या संपूर्ण प्रशासकीय, आर्थिक व विकासात्मक निर्णयप्रक्रियेची सूत्रे त्यांच्या हाती आली आहेत.

स्थायी समिती सभापती हे नगरपंचायतीतील सर्वात प्रभावी व निर्णायक पद मानले जाते.

नगरपंचायतीच्या सर्व विषय समित्यांचे कामकाज, निर्णय, प्रस्ताव, खर्चाचे नियोजन, विकासकामांची मान्यता व अंमलबजावणी हे सर्व अधिकार नगराध्यक्ष मा. उत्तम जाधव (यु. टी.) सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहेत. त्यामुळे नगरपंचायतीतील सर्व सभापती, नगरसेवक व अधिकारी यांना समन्वयाने काम करताना त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावे लागणार आहेत.

 नगराध्यक्ष मा. उत्तम जाधव (यु. टी.) सर हे सकारात्मक, समन्वयक व ठाम निर्णयक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जातात. नगरपंचायतीतील नियोजन व विकास, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा व जलनिस्सारण, स्वच्छता व वैद्यकीय, महिला व बालकल्याण अशा सर्व विषय समित्यांवर थेट नियंत्रण, मार्गदर्शन व देखरेख करण्याचा अधिकार स्थायी समिती सभापती या नात्याने त्यांच्याकडे आहे.

नगरपंचायतीच्या अर्थसंकल्पाला दिशा देणे, विकासकामांना प्राधान्यक्रम ठरवणे, निधीचा योग्य व पारदर्शक वापर, कामांची गुणवत्ता व वेळेत पूर्तता याबाबत अंतिम निर्णय घेण्याची भूमिका नगराध्यक्ष मा. उत्तम जाधव (यु. टी.) सर बजावणार आहेत. त्यामुळे आटपाडी नगरपंचायतीचा कारभार अधिक शिस्तबद्ध, गतिमान व लोकाभिमुख होणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.

निवडीनंतर नगराध्यक्ष मा. उत्तम जाधव (यु. टी.) सर यांनी सर्व सभापती व नगरसेवकांना विश्वासात घेत “नगरपंचायत ही केवळ प्रशासकीय संस्था नसून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारी विकासयंत्रणा आहे. सर्वांनी एकत्रितपणे, जबाबदारीने आणि पारदर्शकतेने काम करावे,” असे स्पष्ट केले.

स्थायी समिती सभापती म्हणून मिळालेल्या व्यापक अधिकारांचा वापर करून आटपाडी शहराचा सर्वांगीण, शाश्वत व वेगवान विकास साधण्याचा त्यांचा निर्धार असून, त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीतील सर्व कामकाजाला नवी दिशा व नवे बळ मिळणार असल्याचा विश्वास नागरिकांतून व्यक्त होत आहे.

To Top