मकरसंक्रांतीनिमित्त दिघंचीत महिलांसाठी भव्य हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन
मनोरंजन, गावराण कॉमेडी, गाणी व आकर्षक भेटवस्तूंनी रंगणार संक्रांतीचा उत्सव
आटपाडी kd24newz :मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर खास महिलांसाठी सामाजिक सलोखा, स्नेह व आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने दिघंची येथे भव्य हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मा. श्री.अमरसिंह (बापूसाहेब) देशमुख यांचे मार्गदर्शन लाभत असून, महिलांसाठी सन्मान व मनोरंजनाचा हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे निमंत्रक श्री. अंकुश शिवाजीराव भोसले (महाराज) संस्थापक, व्यंकटेश्वरा उद्योग समूह, दिघंची असून, मकरसंक्रांतीच्या निमित्ताने महिलांना एकत्र येण्याची संधी मिळावी, सामाजिक संवाद वाढावा व परंपरेचा जपणूक व्हावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात गप्पा-गोष्टी, रंजक खेळ, हिंदी-मराठी गाणी तसेच गावराण कॉमेडीचा खास तडका असणार असून, सिनेअभिनेता क्रांती नाना मळेगावकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक महिलेस आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. वैशाली शिंदे भाळवणकर,सौ. सुनिता पुसावळे,सौ. पंचशिला वाघमारे,सौ. वनिता मोरे,सौ. मनीषा पुसावळे,सौ. रुपाली काळे,सौ. पल्लवी हेगडे,सौ. वैशाली वाघमारे,सौ. शितल चव्हाण,सौ. तनुजा मिसाळ,सौ. करिष्मा रणदिवे,सौ. माधुरी धोत्रे,सौ. अर्चना टिंगरे,सौ. मिना राऊत,सौ. विरश्री चोथे,सौ. गिता त्रिगुणे आदी महिला पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
यांच्याची संपर्क करून कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित राहून शोभा वाढवावी.
हा कार्यक्रम बुधवार, दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ ते १० या वेळेत विर्घची हायस्कूल, दिघंची पटांगण येथे आयोजित करण्यात आला आहे. व्यंकटेश्वरा उद्योग समूह, दिघंची, इम्प्रेशन मेन्स वेअर तसेच व्यंकटेश्वरा टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, सौ. वैशालीताई प्रशांत शिंदे (भालवणकर), अध्यक्षा, मानगंगा महिला प्रभाग संघ, दिघंची यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मकरसंक्रांतीचा सण आनंदात व उत्साहात साजरा करावा,असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
