Sanvad News दिघंची जिल्हा परिषद गटात शिवसेना–राष्ट्रवादी महायुतीचा प्रचार शुभारंभ; १ फेब्रुवारीला भव्य पदयात्रेने निवडणूक रणधुमाळीला सुरुवात

दिघंची जिल्हा परिषद गटात शिवसेना–राष्ट्रवादी महायुतीचा प्रचार शुभारंभ; १ फेब्रुवारीला भव्य पदयात्रेने निवडणूक रणधुमाळीला सुरुवात

Admin

 दिघंची जिल्हा परिषद गटात शिवसेना–राष्ट्रवादी महायुतीचा प्रचार शुभारंभ; १ फेब्रुवारीला भव्य पदयात्रेने निवडणूक रणधुमाळीला सुरुवात


आटपाडी : दिघंची जिल्हा परिषद गटामध्ये आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ व पदयात्रा येत्या दि. १ फेब्रुवारी रोजी दुपारी ठीक ४.०० वाजता मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या कार्यक्रमामुळे संपूर्ण गटात राजकीय वातावरण तापले असून, निवडणूक प्रचाराला अधिकृतपणे वेग येणार आहे.

या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाचा नारळ विविध मान्यवरांच्या हस्ते फोडण्यात येणार असून, प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत ही पदयात्रा पार पडणार आहे. दिघंची जिल्हा परिषद गटामधील शिवसेना–राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार जनतेसमोर विकासाचा स्पष्ट अजेंडा मांडत थेट रस्त्यावर उतरले असून, या पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे.

या भव्य कार्यक्रमास आमदार सुहासभैय्या बाबर, मा. आमदार राजेंद्रआण्णा देशमुख, मा. तानाजीराव पाटील, मा. भारत (दादा) पाटील व मा. अनिलशेठ पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. अनुभवी नेतृत्वाची उपस्थिती आणि कार्यकर्त्यांचा जोश यामुळे हा प्रचार शुभारंभ कार्यक्रम केवळ औपचारिक न राहता महायुतीच्या ताकदीचे प्रभावी शक्तिप्रदर्शन ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

ही पदयात्रा सिद्धनाथ मंदिर पासून बस स्थानक, राजेवाडी चौक, मुख्य बाजारपेठ ते महादेव मंदिर या मार्गाने काढण्यात येणार असून, या संपूर्ण मार्गावर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. धार्मिक, व्यापारी व नागरी केंद्रांना जोडणाऱ्या या मार्गामुळे पदयात्रेला सामाजिक व राजकीय दोन्ही अंगांनी विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत विकास, पारदर्शक कारभार, शेतकरी, कष्टकरी, महिला व युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार महायुतीच्या उमेदवारांनी केला आहे. गेल्या काळात प्रलंबित राहिलेले मूलभूत प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकासाशी संबंधित मुद्दे केंद्रस्थानी ठेवून मतदारांचा विश्वास संपादन करण्यावर भर देण्यात येणार आहे.

या प्रचार शुभारंभ व पदयात्रेमुळे विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली असून, महायुतीच्या संघटित ताकदीपुढे विरोधकांची रणनीती कोलमडताना दिसत आहे. कार्यकर्त्यांची एकजूट, अनुभवी नेत्यांचे मार्गदर्शन आणि जनतेचा वाढता पाठिंबा पाहता, दिघंची जिल्हा परिषद गटात महायुतीची बाजू अधिक भक्कम होत चालली आहे, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. १ फेब्रुवारी रोजी होणारा हा प्रचार शुभारंभ कार्यक्रम आणि पदयात्रा ही केवळ निवडणूक प्रचाराची सुरुवात नसून, महायुतीच्या विजयाच्या दिशेने टाकलेले ठाम पाऊल ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.

To Top