शेठफळे राष्ट्रवादी (शरद पवार गट)चा विनायक शेठ मासाळांना एकमुखी कौल व जाहीर पाठिंबा!
करगणी जि.प.गटातील प्रामाणिक नेतृत्व, विकासाभिमुख भूमिका आणि लोकांशी थेट संवाद यावर व्यक्त केला विश्वास; एकजुटीच्या जोरावर विजय निश्चित असल्याचा निर्धार
आटपाडी : करगणी जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरणांना नवी कलाटणी देणारी घडामोड शेठफळे (ता. आटपाडी) येथे घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) शेठफळे यांनी करगणी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार मा. विनायक शेठ मासाळ यांना जाहीर व ठाम पाठिंबा जाहीर केला आहे. हा पाठिंबा म्हणजे प्रामाणिक नेतृत्वावर, विकासाभिमुख विचारांवर आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणाऱ्या कार्यावर व्यक्त केलेला विश्वास असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
मा. विनायक शेठ मासाळ यांनी आपल्या राजकीय वाटचालीत गावागावांतील नागरिकांशी थेट संवाद साधत शेतकरी, युवक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत प्रश्नांवर त्यांनी नेहमीच ठोस भूमिका घेतली असून विकासाला प्राधान्य देणारी कार्यपद्धती राबवली आहे. याच कामगिरीमुळे शेठफळे गावातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चा भक्कम पाठिंबा त्यांना मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
या पाठिंब्यामुळे करगणी जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरणात मोठी चैतन्याची लाट निर्माण झाली असून, येणाऱ्या काळात सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. एकजूट, विश्वास आणि परिवर्तनाच्या जोरावर यावेळी विजय निश्चित असल्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
यावेळी किशोर दगडू गायकवाड (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार – सोशल मीडिया, आटपाडी), ज्येष्ठ नेते सुभाष गायकवाड, शिवाजीराव ननवरे, पांडुरंग ननवरे, हनुमंतराव गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, विनायक गायकवाड, भारत गायकवाड, जयराम ननवरे, रामचंद्र गायकवाड, बाबुराव गायकवाड, विशाल गायकवाड, गणेश गायकवाड, सिद्धेश्वर गायकवाड, समाधान गायकवाड, विकी गायकवाड, कैलास गायकवाड, शुभम गायकवाड, हर्षवर्धन गायकवाड, पप्पू गायकवाड, सुखदेव चव्हाण, योगेश ननवरे, पिंटू शिंदे, नवनाथ शिंदे, अभिजीत शिंदे, स्वप्नील शिंदे, रोहित गायकवाड, प्रथमेश गायकवाड, प्रतीक गायकवाड, शाहीर प्रभाकर भोरे, दत्तात्रय कांबळे, अरुण कांबळे, गुलाब कांबळे, भैय्या बुरुंगले, विक्रमसिंह गायकवाड, राजेंद्र गायकवाड, अभिजीत गायकवाड, गुलाब गायकवाड, विधान गायकवाड, पांडुरंग गायकवाड, सौरभ गायकवाड, संस्कार गायकवाड, बाळकृष्ण गायकवाड यांच्यासह शेठफळे गावातील असंख्य कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूणच शिवसेना - राष्ट्रवादी अजित पवार गटास शेठफळे गावातून मिळालेला हा ठाम पाठिंबा करगणी जिल्हा परिषद गटातील निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता असून, राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

