लिंगीवरेत सामाजिक एकजुटीचा निर्धार; होलार समाजाचा पृथ्वीराज पाटील यांना ठाम पाठिंबा
अनिल शेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास; दिघंची जिल्हा परिषद गटात विजयाचा मार्ग प्रशस्त
आटपाडी kd24newz:लिंगीवरे (ता. आटपाडी) येथील होलार समाजाने दिघंची जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार मा. पृथ्वीराज पाटील यांना जाहीर व ठाम पाठिंबा देत आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा पाठिंबा केवळ राजकीय नसून, तो प्रामाणिक नेतृत्व, विकासाभिमुख विचारसरणी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणाऱ्या कार्यावर व्यक्त केलेला ठाम विश्वास असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
मा.पृथ्वीराज पाटील यांनी आजवर गावागावांत थेट लोकांशी संवाद साधत शेतकरी, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्या अडचणी समजून घेतल्या. पाणी, रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य, रोजगार यांसारख्या मूलभूत प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. याच लोकाभिमुख व कार्यक्षम कार्यपद्धतीमुळे लिंगीवरे गावातून त्यांना मोठ्या प्रमाणावर भक्कम पाठिंबा मिळत आहे.
या जाहीर पाठिंब्याच्या कार्यक्रमावेळी लिंगीवरे गावातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे कार्यकर्ते सतीश बबन कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अनिल शेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला जाहीर पाठिंबा दर्शविला. याप्रसंगी संपूर्ण गावातील नागरिकांच्या वतीने मा. पृथ्वीराज पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच लिंगीवरे गावातून यंदा जास्तीत जास्त मताधिक्य देऊन विजय निश्चित करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात बोलताना अनिल शेठ पाटील म्हणाले की, “येणाऱ्या काळात लिंगीवरे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही करता येईल ते प्राधान्याने केले जाईल. गावातील कोणताही तरुण बेरोजगार राहणार नाही यासाठी कामाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल. तसेच नागरिकांना आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सुख-सुविधांचे योग्य नियोजन करण्यात येईल.” त्यांच्या या आश्वासनाला उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला
यावेळी अनिल पाटील यांच्या हस्ते अनेक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सतीश कांबळे, अर्जुन जावीर, सागर यादव, परमेश्वर खटके, शेकर पडळे, समाधान जावीर, भीमराव जावीर, गणेश जावीर, विशाल खांडेकर, उत्कर्ष काळेबाग, विशाल कांबळे, हर्षद जावीर, पोपट जावीर, जगन्नाथ जावीर, विजय खांडेकर, नितीन काटे, सुरज शेख, साहिल शेख यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूणच लिंगीवरे येथील होलार समाजाचा जाहीर पाठिंबा, कार्यकर्त्यांची वाढती ताकद आणि गावागावांतून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, दिघंची जिल्हा परिषद गटात मा. पृथ्वीराज पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

