शिक्षक बँकेच्या आटपाडी–विटा शाखेच्या संचालकपदी सचिन खरमाटे यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न
सभासद हितासाठी ठाम भूमिका ठेवणाऱ्या संचालकांचा आटपाडीत भव्य सत्कार; शिक्षक संघटनांचा जाहीर पाठिंबा
आटपाडी kd24newz ; सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या आटपाडी व विटा शाखेच्या शाखा संचालकपदी शिक्षक बँकेचे संचालक सचिन खरमाटे यांची निवड झाल्याने, त्यांच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त आटपाडी येथे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक समिती, आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक संघ, जुनी पेन्शन संघटना आटपाडी व शिक्षक भारती आटपाडी या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व शिक्षक नेते जगन्नाथ कोळपे हे होते.
यावेळी शिक्षक नेते अविनाश गुरव, संचालक अमोल माने, नितीन चव्हाण, राहुल पाटणे, कृष्णा पोळ, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन यु.टी. जाधव व पोपटराव सूर्यवंशी, तालुका संघटनांचे अध्यक्ष संजय कबीर, यशवंत गोडसे, नितीन गळवे, बिरू मुढे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच मिरज अध्यक्ष बाळू गायकवाड, तासगाव अध्यक्ष धनाजी साळुंखे, आनंदराव उतळे सर यांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली.
शिक्षक बँकेच्या गेल्या तीन वर्षांच्या वाटचालीत विरोधाची भूमिका ठामपणे बजावणारे संचालक सचिन खरमाटे सर व कृष्णा पोळ सर यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते येथोचित सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी संघटनेचे नेते विश्वास पुजारी यांनी “चांगल्या कारभारास आमचा पाठिंबा राहील, मात्र सभासद हिताच्या विरोधातील कोणत्याही कारभारास आम्ही सदैव विरोध करू” अशी ठाम भूमिका मांडली. त्यांच्या भाषणाला उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
सत्कारास उत्तर देताना कृष्णा पोळ सर व सचिन खरमाटे सर यांनी “सभासदांचे हित केंद्रस्थानी ठेवूनच कारभार केला जाईल. सभासदांचा मान-सन्मान जपण्यासाठी आम्ही आमचे सर्वस्व पणाला लावू” अशी ग्वाही दिली.
माजी चेअरमन पोपटराव सूर्यवंशी यांनी एकाधिकारशाहीला कंटाळून या स्वाभिमानी संचालकांनी घेतलेल्या निर्णयाचे तोंडभरून कौतुक केले. “नियत चांगली ठेवली तर तिचे फळ नक्की मिळते,” असे सांगत पुढील काळात संचालकांनी एकत्रित व संघटित राहून सभासद हिताचे निर्णय घ्यावेत, असा मोलाचा सल्ला दिला.
जिल्हाध्यक्ष व संचालक अमोल माने यांनी आटपाडी तालुक्यातील संघटनांच्या कामगिरीचे कौतुक करताना आटपाडी शाखेची इमारत आमदार शि.द. पाटील यांच्या कार्यकाळात उभी राहिल्याचा विशेष उल्लेख केला.
माजी संचालक उत्तम तायाप्पा जाधव यांनी “शिक्षकांच्या कोणत्याही कामासाठी मंत्रालय पातळीपर्यंत माझे सहकार्य राहील. मी जरी शिक्षकी पेशातून बाहेर गेलो असलो, तरी शिक्षकांशी असलेली माझी नाळ कधीही तुटणार नाही,” असे आश्वासन दिले.
शिक्षक नेते अविनाश गुरव यांनी आपल्या भाषणात “माझी पत्नी शिक्षक बँकेची चेअरमन असून, त्यांच्या माध्यमातून सभासदांना पुढील काळात जास्तीत जास्त डिव्हीडंट देण्याचा प्रयत्न करू,” असे सांगितले व सभासद समाधानाची गांभीर्याने काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही दिली.
अध्यक्षीय भाषणात जगन्नाथ कोळपे सर यांनी या सत्कार सोहळ्याच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल संघटनांचे कौतुक केले.
तसेच “बँकेचा एखादा सभासद दुर्दैवाने मृत्युमुखी पडल्यास, त्याच्या वारसाला शिक्षक बँकेच्या माध्यमातून शंभर लाख म्हणजेच एक कोटी रुपयांपर्यंत मदत देण्याच्या दृष्टीने येणाऱ्या जनरल सभेत ठराव मंजूर करून अशी योजना राबवली जाईल,” अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली.
कार्यक्रमाचे स्वागत शाम ऐवळे, प्रास्ताविक हैबतराव पावणे, तर सूत्रसंचालन यशवंत गोडसे यांनी केले.
संजय कबीर, नितीन गळवे, बिरु मुढे, प्रवीण बाड, संतोष बाड यांनी मनोगते व्यक्त केली.आभार दीपक कबीर यांनी मानले.
या कार्यक्रमास मारुती देवडकर, कुंडलिक केंगार, विलास गळवे, अजय राक्षे, तानाजी गळवे, शांताराम यादव, नाना झुरे, इन्ताब इनामदार, रावसाहेब देवडकर, संजय काळेल, भीमराव सावंत, विजय पवार यांच्यासह तालुक्यातील सर्व केंद्रांतील शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी शाखा संचालक सचिन खरमाटे सर यांना शाखेमध्ये संचालकाच्या खुर्चीवर मान्यवरांच्या हस्ते सन्मानाने बसविण्यात आले, तसेच शिक्षक बँकेचे शाखा अधिकारी व सर्व कर्मचारी वर्गाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

