Sanvad News विठलापुरमध्ये ॲड. सुयश कदम यांची प्रचारात मोठी आघाडी; तरुणांचा वाढता पाठिंबा!

विठलापुरमध्ये ॲड. सुयश कदम यांची प्रचारात मोठी आघाडी; तरुणांचा वाढता पाठिंबा!

Admin

 विठलापुरमध्ये ॲड. सुयश कदम यांची प्रचारात मोठी आघाडी; तरुणांचा वाढता पाठिंबा!


आटपाडी:आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विठलापुर पंचायत समिती गणामध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲड. सुयश कदम यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. 'घर टू घर' प्रचार आणि गावभेट दौऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधत विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

ॲड. सुयश कदम यांचा प्रचार केवळ घोषणांपुरता मर्यादित नसून, त्यांनी विकासाचे ठोस मुद्दे जनतेसमोर मांडले आहेत. प्रामुख्याने रस्ते, आरोग्य सुविधा, आणि शेतीचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यांच्या या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे सुशिक्षित वर्ग आणि सर्वसामान्य नागरिक त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत.

तरुणाईचा वाढता कल....!

या निवडणुकीत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तरुणांचा वाढता पाठिंबा. विठलापुर गणातील तरुण मोठ्या संख्येने ॲड. कदम यांच्या सोबत प्रचारात उतरले आहेत. एका युवा आणि उच्चशिक्षित उमेदवाराच्या रूपाने आपल्या प्रश्नांना वाचा फुटेल, असा विश्वास तरुणांमध्ये दिसून येत आहे.

To Top