Sanvad News जिल्हाधिकारी अशोक काकडे महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 ने सन्मानित…!“सांगली जिल्ह्याचा अभिमान उंचावला!

जिल्हाधिकारी अशोक काकडे महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 ने सन्मानित…!“सांगली जिल्ह्याचा अभिमान उंचावला!

Admin

 जिल्हाधिकारी अशोक काकडे महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 ने सन्मानित…!

 जिल्हाधिकारी यांच्या कार्याचा दणदणीत राज्यस्तरीय गौरव” “सांगली जिल्ह्याचा अभिमान उंचावला;“महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सांगलीचा डंका राज्यभर.; प्रामाणिक प्रशासन, लोकाभिमुख कामकाज आणि विकासदृष्टीची दखल; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव!


आटपाडी kd24newz ; सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने धडाडीने आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्याचा राज्यस्तरावर दणदणीत गौरव झाला असून त्यांना प्रतिष्ठेचा “महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025” जाहीर झाला आहे. “Voice of Media International Forum” आणि महाराष्ट्र शासन आयुष्यमान भारत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून या गौरवामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्याचा डंका राज्यभर वाजला आहे.

    या पुरस्कारामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून जिल्हाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा अक्षरशः वर्षाव होत आहे. जिल्ह्याच्या प्रशासनात पारदर्शकता, कार्यतत्परता आणि लोकाभिमुख निर्णय प्रक्रियेचा आदर्श निर्माण करणाऱ्या त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आल्याचे मानले जात आहे.

   मुंबई येथे आयोजित भव्य सोहळ्यात “व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम” व महाराष्ट्र शासनाच्या आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्हाधिकाऱ्यांना “महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025” प्रदान करण्यात आला. मा. मंत्री मंगळ प्रसाद लोढा, ओमप्रकाश शेते व संदीप काळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी मंचावर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

   या वेळी उपस्थित मान्यवरांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी केलेले योगदान उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार काढले.

   जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विकासकामांना दिलेली गती, विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत घेतलेली तातडीची दखल यामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यात विश्वासाचे नवे नाते निर्माण झाले आहे. त्यांच्या निर्णयक्षम नेतृत्वामुळे अनेक विकासकामांना नवी चालना मिळाली असून जिल्ह्याच्या प्रगतीला वेग आला आहे.

    सामान्य माणसाच्या समस्या ऐकून त्या मार्गी लावण्याची त्यांची कार्यपद्धती, प्रशासनातील पारदर्शकता आणि समाजाप्रती असलेली संवेदनशीलता यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विशेष आदराची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळेच “महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025” हा सन्मान केवळ एका अधिकाऱ्याचा नसून संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या कर्तृत्वाचा आणि अभिमानाचा क्षण ठरला आहे.

    पुरस्कार जाहीर होताच विविध संघटना, संस्था, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी हा सन्मान सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या त्यांच्या अथक परिश्रमांची पावती असल्याची भावना व्यक्त केली.

    जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी घेतलेली भूमिका आणि लोकहिताला प्राधान्य देणारी प्रशासनशैली यामुळे ते जनतेच्या मनात वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत. भविष्यातही त्यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.

To Top