Sanvad News सांगलीत ‘करेक्ट कार्यक्रम’! जयंत पाटलांची मास्टरस्ट्रोक रणनिती; जिल्हा परिषदेत मविआचा झेंडा दणक्यात फडकला!

सांगलीत ‘करेक्ट कार्यक्रम’! जयंत पाटलांची मास्टरस्ट्रोक रणनिती; जिल्हा परिषदेत मविआचा झेंडा दणक्यात फडकला!

Admin

 सांगलीत ‘करेक्ट कार्यक्रम’! जयंत पाटलांची मास्टरस्ट्रोक रणनिती; जिल्हा परिषदेत मविआचा झेंडा दणक्यात फडकला

भाजपचा दावा फोल; संगीता पाटील अध्यक्षपदी विजयी, ऋषिकेश लाड उपाध्यक्ष, शिंदे सेनेच्या गैरहजेरीने युतीचा डाव कोलमडला

आटपाडी kd24newz ; सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तासंघर्षात अखेर महाविकास आघाडीने निर्णायक बाजी मारत भाजप-युतीला जोरदार धोबीपछाड दिली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या संगीता पाटील यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दमदार विजय मिळवत जिल्हा परिषदेवर मविआचा झेंडा रोवला. या विजयामागे आमदार जयंत पाटील यांची अचूक रणनिती आणि सूक्ष्म राजकीय गणित निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 अध्यक्षपदाची लढत एकतर्फी...!

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप-युतीच्या स्वप्नाली मासाळ आणि आघाडीच्या संगीता पाटील यांच्यात थेट लढत झाली.सं

गीता पाटील — ३४ मते

स्वप्नाली मासाळ — २४ मते.

     शीतल बाबर आणि प्रतिमा मोरे यांनी माघार घेतल्याने थेट सामना रंगला, मात्र त्यात आघाडीने स्पष्ट आघाडी घेतली.

 उपाध्यक्षपदावरही आघाडीची सरशी....!

उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीने वर्चस्व कायम ठेवत ऋषिकेश लाड यांनी भाजप-युतीचे हिम्मत जाधव यांचा पराभव केला.

ऋषिकेश लाड — ३४ मते

हिम्मत जाधव — २५ मते.

        अध्यक्षपदापाठोपाठ उपाध्यक्षपदावरही विजय मिळवत आघाडीने जिल्हा परिषदेवर पूर्ण पकड मजबूत केली.

 रणनिती ठरली गेमचेंजर....!

     या विजयामागे आमदार विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील आणि विशेषतः जयंत पाटील यांची अचूक रणनीती प्रभावी ठरली.मतांची काटेकोर मांडणी, व्हीपची शिस्त आणि शेवटच्या क्षणापर्यंत सदस्यांना एकत्र ठेवण्याचे कौशल्य आघाडीला निर्णायक ठरले.

 शिंदे सेनेची गैरहजेरी ठरली निर्णायक....!

     निवडणुकीत शिंदे सेनेचे सदस्य जयदीप भोसले आणि पृथ्वीराज पाटील गैरहजर राहिल्याने भाजप-युतीचे गणित पूर्णपणे कोलमडले.हे दोन्ही सदस्य उपस्थित असते, तर लढत अधिक चुरशीची झाली असती, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भाजपचा ‘आत्मविश्वास’ ठरला धोकादायक...!

     याआधी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी “अध्यक्ष भाजपाचाच होणार” असा ठाम दावा केला होता. मात्र प्रत्यक्ष निकालाने हा दावा पूर्णतः फोल ठरला.यामुळे भाजपच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

 बैठकीतच ठरली होती बाजी....!

    निवडणुकीच्या आदल्या दिवशी मविआ नेत्यांची सांगलीत गुप्त बैठक झाली होती.त्यात मतदानाची रणनीती, व्हीप, पदांचे वाटप यावर अंतिम शिक्कामोर्तब झाले होते.भाजपाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवत आघाडीने आपली बाजू अधिक मजबूत केली.

 राजकारणात मविआचे वर्चस्व पुन्हा अधोरेखित....!

   या विजयामुळे सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आघाडीची पकड मजबूत होत असून, आगामी निवडणुकांसाठी हा निकाल निर्णायक मानला जात आहे.

      एकंदरीत, सांगली जिल्हा परिषदेत झालेला हा ‘करेक्ट कार्यक्रम’ केवळ सत्ताबदल नसून राजकीय रणनीती, शिस्त आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय यांचे प्रभावी उदाहरण ठरला आहे.

To Top