Sanvad News “कर्तव्याबरोबर पितृत्वही महत्त्वाचे!” आमदार सुहासभैय्या बाबर यांनी मुलगा राजविरला परीक्षा केंद्रावर सोडत निभावली पालकांची भूमिका

“कर्तव्याबरोबर पितृत्वही महत्त्वाचे!” आमदार सुहासभैय्या बाबर यांनी मुलगा राजविरला परीक्षा केंद्रावर सोडत निभावली पालकांची भूमिका

Admin

 “कर्तव्याबरोबर पितृत्वही महत्त्वाचे!” आमदार सुहासभैय्या बाबर यांनी मुलगा राजविरला परीक्षा केंद्रावर सोडत निभावली पालकांची भूमिका

अधिवेशनाच्या व्यस्त कामकाजातही वेळ काढत विटा हायस्कूल येथे मुलाला दिला प्रोत्साहनाचा आधार

आटपाडी, kd24newz ; सार्वजनिक जीवनातील जबाबदाऱ्या सांभाळताना कुटुंबीयांसाठी वेळ काढणे किती महत्त्वाचे असते याचा प्रत्यय आटपाडी-खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहासभैय्या बाबर यांनी दिला. आपल्या थोरल्या चिरंजीव चि. राजविर याची दहावीची परीक्षा सुरू असल्याने त्यांनी स्वतः परीक्षा केंद्रावर जाऊन त्याला शुभेच्छा देत पालकत्वाची जबाबदारी पार पाडली.

राज्याच्या अधिवेशनाच्या व्यस्त कार्यक्रमामुळे दहावीच्या परीक्षेच्या पहिल्या पेपरच्या दिवशी त्यांना उपस्थित राहता आले नव्हते. मात्र त्याची खंत मनात ठेवत आज त्यांनी आवर्जून वेळ काढला आणि विटा येथील हायस्कूलमध्ये जाऊन चि. राजविर याला परीक्षा केंद्रावर सोडले. यावेळी त्यांनी मुलाला आत्मविश्वासाने परीक्षा देण्याचा सल्ला देत उत्तम यशासाठी शुभेच्छा दिल्या.

सार्वजनिक जीवनात मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या व्यक्तींनाही आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल तितकीच काळजी असते, याचे हे उदाहरण ठरले. पालकांचा आधार आणि प्रोत्साहन विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात मोठे बळ देत असते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, आमदार बाबर यांनी सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत शांतपणे, आत्मविश्वासाने परीक्षा देण्याचे आवाहन केले. मेहनत, चिकाटी आणि योग्य नियोजनाच्या बळावर विद्यार्थी उज्ज्वल यश संपादन करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

परीक्षेच्या केंद्राबाहेर अनेक पालक आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते. त्या वातावरणात आमदार बाबर यांनीही साधेपणाने पालकाची भूमिका निभावत मुलाच्या पाठीशी उभे राहत सकारात्मक संदेश दिला.

To Top