Sanvad News महिला आयोगासाठी नवे नेतृत्व कोणाचे? तृप्ती देसाई यांच्या नावाला जोरदार पाठिंबा!सामाजिक कार्याचा भक्कम अनुभव; पै.विजय वाक्षे यांची ठाम मागणी!

महिला आयोगासाठी नवे नेतृत्व कोणाचे? तृप्ती देसाई यांच्या नावाला जोरदार पाठिंबा!सामाजिक कार्याचा भक्कम अनुभव; पै.विजय वाक्षे यांची ठाम मागणी!

Admin

 महिला आयोगासाठी नवे नेतृत्व कोणाचे? तृप्ती देसाई यांच्या नावाला जोरदार पाठिंबा!


सामाजिक कार्याचा भक्कम अनुभव; पै.विजय वाक्षे यांची ठाम मागणी!

आटपाडी kd24newz : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नव्या नेतृत्वाची निवड करण्याची वेळ निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या नावाला जोरदार पाठिंबा मिळताना दिसत आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय वाक्षे यांनी पत्रकाद्वारे देसाई यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.

    माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर या खरात प्रकरणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे सध्या हे पद रिक्त असून, योग्य व अनुभवी नेतृत्वाची गरज अधोरेखित होत आहे.

    तृप्ती देसाई यांनी २००८ साली सहकारी बँकेतील गैरकारभाराविरोधात आंदोलन करून आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात केली. त्यानंतर २०१० मध्ये त्यांनी भूमाता ब्रिगेड ची स्थापना केली. महिलांना धार्मिक स्थळांमध्ये समान हक्क मिळावा, यासाठी त्यांनी विविध ठिकाणी प्रभावी आंदोलने केली. विशेषतः मंदिर प्रवेशाच्या प्रश्नावर त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्या राज्यभर चर्चेत आल्या.

     महिलांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणाऱ्या आणि सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेणाऱ्या नेतृत्वाची आज महिला आयोगाला गरज असल्याचे वाक्षे यांनी नमूद केले. “तृप्ती देसाई यांचा संघर्षमय प्रवास, संघटन कौशल्य आणि महिलांविषयी असलेली बांधिलकी पाहता त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती योग्य ठरेल,” असेही त्यांनी पत्रकात स्पष्ट केले.

     दरम्यान, महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी विविध स्तरावर चर्चांना वेग आला असून, राज्य सरकारकडून लवकरच या पदावर नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रभावी धोरणे राबविणारे आणि न्याय मिळवून देणारे नेतृत्व कोण असेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

To Top