मिरजच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. नीता श्रीकांत आवटी यांना ‘महाराष्ट्ररत्न सन्मान पुरस्कार’
अल्पावधीत प्रभावी सामाजिक कामगिरीची दखल; जयसिंगपूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न!
आटपाडी kd24newz ;मिरज तालुक्यात सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी धडाडीने काम करणाऱ्या सौ. नीता श्रीकांत आवटी यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘महाराष्ट्ररत्न सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
हा गौरव सोहळा जयसिंगपूर येथे पार पडला असून, बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था, मिरज यांच्या वतीने हा सन्मान देण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) महिला आघाडीच्या मिरज तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या सौ. नीता आवटी यांनी अल्पावधीतच गोरगरीब, कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विशेषतः अन्यायग्रस्त महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न समाजात आदर्शवत ठरत आहेत. त्यांच्या कार्यामुळे मिरज तालुक्यात त्या अल्पकाळातच लोकप्रिय झाल्या आहेत.
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात सातत्य, जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या जोरावर त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या विचारांनी व कार्यकर्तृत्वाने अनेक युवक-युवतींना दिशा मिळाली असून समाजाला विकासाचा मार्ग दाखवण्याचे काम त्यांनी केले आहे.
हा महाराष्ट्ररत्न सन्मान पुरस्कार जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास सिद्धकला बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था, मिरज चे संस्थापक अध्यक्ष गंगाराम शिवमूर्ती सातपुते सर, उपाध्यक्ष श्री. गणेश मधुकर कांबळे, मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख (शिवसेना) श्री. तानाजी सातपुते, एमआरपीचे जिल्हाध्यक्ष श्री. महेंद्र गाडे, महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ. अश्विनी कोळी, सामाजिक कार्यकर्ते राकेश शिंदे यांच्यासह रेखाताई काळे (फेमस रील स्टार), अंजली आकाळे (सिने अभिनेत्री व फेमस रील स्टार) तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ. नीता श्रीकांत आवटी यांच्या या सन्मानामुळे मिरज तालुक्याच्या सामाजिक कार्यक्षेत्रात नवा उत्साह निर्माण झाला असून, त्यांचे कार्य आगामी काळात अधिक व्यापक स्वरूपात समाजासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
