वेंकटेश्वरा उद्योग समूह व वेंकटेश्वरा टूर्स अँड ट्रॅव्हल्सकडून महिलांना मोफत पंढरपूर दर्शन
अधिक मासानिमित्त आटपाडी तालुक्यातील बचत गटांच्या महिलांसाठी चंद्रभागा स्नान व श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनाची व्यवस्था; दररोज ४० महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
अधिक मासानिमित्त वेंकटेश्वरा उद्योग समूह व वेंकटेश्वरा टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या वतीने आयोजित मोफत पंढरपूर दर्शन यात्रेत सहभागी झालेल्या आटपाडी तालुक्यातील बचत गटातील महिला
आटपाडी kd24newz :दिघंची,अधिक मासाच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधत वेंकटेश्वरा उद्योग समूह व वेंकटेश्वरा टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या वतीने बचत गटातील महिलांसाठी मोफत पंढरपूर दर्शन उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमाला आटपाडी तालुक्यातील महिला वर्गाकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. चंद्रभागा स्नान, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शन आणि मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देत समाजसेवा व अध्यात्म यांचा सुंदर संगम घडवून आणण्यात आला आहे.
ह.भ.प. श्री अंकुश महाराज भोसले यांच्या प्रेरणेतून व सामाजिक कार्यकर्ते श्री प्रशांत शिंदे (भाळवणकर) यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. माणगंगा महिला प्रभाग संघ, दिघंचीच्या अध्यक्षा सौ. वैशाली प्रशांत शिंदे (भाळवणकर) यांच्या नेतृत्वाखाली बचत गटातील महिलांना या यात्रेत सहभागी करून घेतले जात आहे.
विशेष म्हणजे, हा उपक्रम सलग चौथ्या दिवशीही यशस्वीपणे सुरू असून दररोज सुमारे ४० महिलांना पंढरपूर येथे नेण्यात येत आहे. उद्या आणि परवाही हा उपक्रम सुरू राहणार असून आणखी शेकडो महिलांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ मिळणार आहे.
दिघंचीसह भाळवणी, करगणी, झरे, मेटके, लोटेवाडी, आटपाडी तसेच परिसरातील अनेक गावांतील बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होत आहेत. आर्थिक, कौटुंबिक किंवा इतर कारणांमुळे अनेक महिलांना पंढरपूर दर्शनाची संधी मिळत नाही. अशा महिलांसाठी हा उपक्रम अक्षरशः वरदान ठरत आहे. अनेक महिलांनी प्रथमच पंढरपूर येथे जाऊन चंद्रभागेत स्नान करून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्याने आनंद व्यक्त केला.
अधिक मास हा धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात केलेली भक्ती, सेवा आणि दानधर्म याला विशेष महत्त्व असते. याच भावनेतून वेंकटेश्वरा उद्योग समूह व वेंकटेश्वरा टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांनी ग्रामीण भागातील महिलांना विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. महिलांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि भक्तिभाव पाहून आयोजकांनाही मोठे समाधान लाभत आहे.
समाजातील सर्वसामान्य महिलांपर्यंत धार्मिक व आध्यात्मिक लाभ पोहोचविण्याबरोबरच महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे. सेवाभावी वृत्ती, सामाजिक बांधिलकी आणि वारकरी परंपरेप्रती असलेली श्रद्धा याचे दर्शन या उपक्रमातून घडत असून, आटपाडी तालुक्यात या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
"विठ्ठल दर्शन प्रत्येक माऊलीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प"....
अधिक मासाच्या निमित्ताने बचत गटातील महिलांना मोफत पंढरपूर दर्शन घडवून आणण्याचा संकल्प वेंकटेश्वरा उद्योग समूह व वेंकटेश्वरा टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांनी केला आहे. दररोज ४० महिलांना मोफत प्रवास, चंद्रभागा स्नान आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. चौथ्या दिवशीही मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदविला असून उद्या व परवाही हा उपक्रम सुरू राहणार आहे.
अधिक संपर्क : ८८८८११२४२२.

