कॉक्रोच जनता पार्टीच्या नव्या राजकीय पर्वाला मानदेशाची साथ; पुण्यात संस्थापक अभिजीत दिपके यांची सदिच्छा भेट
मानदेश प्राईमच्या संपादकाकडून शुभेच्छा; आटपाडी-मान तालुक्याच्या विकासात्मक प्रश्नांवर सखोल चर्चा
आटपाडी प्रतिनिधी : पुणे...कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची पुणे येथे मानदेश प्राईमचे संपादक व उपसंपादक यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
आटपाडी तालुका आणि मान तालुक्यातील जनतेचे प्रश्न, ग्रामीण विकास, युवकांसाठी रोजगार निर्मिती, शेतकरी हिताचे विषय तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा यावर सविस्तर विचारमंथन झाले. नव्याने स्थापन झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली जावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी मानदेश प्राईमच्या प्रतिनिधींनी पक्षाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देत लोकहिताच्या विषयांवर ठामपणे काम करण्याचे आवाहन केले. मानदेशाच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याबाबतही चर्चा झाली.
"मानदेशाचा आवाज आता नव्या राजकीय व्यासपीठावर; कॉक्रोच जनता पार्टीच्या वाटचालीला आटपाडी व मान तालुक्यातून शुभेच्छा!" अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
